Download App

विधानसभेत जाण्यासाठी आशीर्वाद द्या; विकासाची ग्वाही देत वळसे पाटलांची साद..

Dilip Walse Patil Speech : ‘लोकसभा निवडणुकीत तुम्हाला फसवलं गेलं. कुणीतरी सांगितलं चारसौ पार कशासाठी पाहिजे तर आरक्षण हिरावून घेण्यासाठी असा चुकीचा प्रचार केला. पण मी सांगतो तुमचं आरक्षण कुणीच काढून घेऊ शकत नाही. आपल्याला मतदारसंघातील अनेक मार्गी लावायचे आहेत. यासाठी तुम्ही मला विधानसभेत निवडून जाण्यासाठी आशीर्वाद द्या’, असं आवाहन अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी केलं. वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत तळेघर येथे जाहीर सभा झाली. या सभेत दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

मतदारसंघामध्येच रोजगार उपलब्ध झाल्याने मुंबई-पुण्याला जाणारे लोंढे थांबले ; दिलीप वळसे पाटील

वळसे पाटील पुढे म्हणाले, ‘तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक तरुण किंवा ज्येष्ठांनी पुढाकार घेतला पाहिजे. आज बऱ्याच संघटना आहेत. त्यांचं उद्दीष्ट काय मला माहिती करून घ्यायचं नाही. मला फक्त सामान्य माणसाचा विकास करायचा आहे. तळेघरला तीस खाटांचं रुग्णालय मंजूर केलं. त्याचंही काम आता लवकरच पूर्ण होणार आहे. भीमाशंकर विकासाचा आराखडा दोन वर्षांत संपवला असता. पण यात बऱ्याच अडचणी येत आहेत.’

‘भीमा शंकर पाणी योजना सुरू केली. गोठेवाडीत तलाव बांघलाय. कोंढवडला तलाव हाती घेतलाय. मी अधिकाऱ्यांना सांगून काम सुरू केलं. पण बंधारा अर्धाच बांधून झाला. पूर्ण होईल तेव्हा डिंभे धरणातून पाणी मिळालं पाहिजे ही मागणी राहणार नाही. जेवढे प्रयत्न करायला पाहिजेत तेवढे प्रयत्न आपण केले आहेत’, असे वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले.

‘बेरोजगार तरुणांना काम मिळालं पाहिजे. मी काही जणांना महाबळेश्वरला पाठवलं होतं. तेथील स्ट्रॉबेरीची शेती पाहून आता येथेही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लावली. त्यांनाही यातून चार पैसे मिळाले पाहिजेत असा हेतू आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. हिरडा पिकांच्या नुकसानीची भरपाई आपण तुम्हा सर्वांच्या ताकदीनं देऊ शकलो.

दिलीप वळसे पाटील साहेबांनी आम्हाला मोठं केलंय, तालुक्याचा विकास केलाय ; विष्णू काका हिंगे

आता मी एकच सांगतो. लोकसभेत तुम्हाला फसवलं गेलं. कुणीतरी म्हटलं अबकी बार चार सौ पार.. या लोकांनी नंतर अपप्रचार केला. कुणीच तमुचं आरक्षण काढू शकणार नाही असे वळसे पाटील यांनी ठणकावून सांगितले.

follow us