Download App

नवाब मलिक उमेदवारीच्या प्रतीक्षेत, आशिष शेलार म्हणाले, ‘आमचा मलिकांना पाठिंबा नाहीच…

नवाब मलिक यांचे काम भाजप करणार नाही, असं भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले.

  • Written By: Last Updated:

Nawab Malik : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या उमेदवारीबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली. अणुशक्तीनगर हा नवाब मलिक यांचा हक्काचा मतदारसंघ असताना राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) तिथून त्यांची मुलगी सना मलिक (Sana Malik) यांना उमेदवारी दिली. तर मलिकांना मानखुर्दमधून तिकीट मिळेल, अशी चर्चा आहे. यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली.

‘हा सोपा निर्णय नव्हता’, द साबरमती रिपोर्ट बद्दल राशी खन्नानने केला मोठा खुलासा 

नवाब मलिक यांचे काम भाजप करणार नाही, असं भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

मलिक अजितदादा गटाकडून अणुशक्तीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, गुरुवारी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत सविस्तर बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील भाजप नेत्यांकडून मलिकांना विरोध असल्याने या बैठकीत मलिकांच्या उमेदवारी संदर्भातही चर्चा झाली. अखेर नवाब मलिक यांच्या उमेदवारीला अमित शाह यांनीही विरोध दर्शवल्याचं समोर आलं.

महाराष्ट्राच्या राजकारणात नवी आघाडी ?, संभाजीराजेंनी घेतील जरांगे पाटलांची भेट, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा 

फडणवीसांचा मलिकांना विरोध…
तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात मंत्री नवाब मलिक यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यामुळे त्याला तुरुंगात जावे लागले. अजितदादांनी शिंदे सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर तुरुंगातून सुटलेल्या मलिक यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला. त्यामुळे राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीत त्यांचे नाव नाही. मात्र, शुक्रवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत त्यांच्या मुलीचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

मलिकांचे काम करणार नाही- शेलार
तर मलिक हे मानखुर्द-शिवाजी नगरमधून निवडणूक लढवणार आहेत, अशी चर्चा आहे. यावर बोलतांना आशिष शेलार म्हणाले की, दाऊदशी संबंधित असलेल्या नवाब मलिक यांचे काम भाजप कार्यकर्ते करणार नाहीत. आमची भूमिका ठाम आहे. आम्ही नवाब मलिक यांना पाठिंबा देणार नाही. आम्ही वेगळी भूमिका घेऊ. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांना तिकीट देणे आम्हाला मान्य नाही, असं शेलार म्हणाले.

दरमम्यान, अजितदादा गटाने सना मलिक यांना पूर्व मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघातून तिकीट दिले. आज सकाळी त्यांनी एबी फॉर्मही घेतला. सना यांच्यावर कोणतेही आरोप विरोधकांना करता येणार नाही, असा तर्क अजितदादांनी मांडला असावा.

follow us