नवाब मलिक यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय; दिल्लीतील बैठकीत ठरलं सूत्रांची माहिती

  • Written By: Published:
नवाब मलिक यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय; दिल्लीतील बैठकीत ठरलं सूत्रांची माहिती

Nawab Malik : काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) आपल्या ३८ उमेदवारांची नावं जाहीर केली. येवल्यातून छगन भुजबळ तर परळीतून धनंजय मुंडेंना उमेदवारी मिळाली. या यादीत नवाब मलिक (Nawab Malik) आणि सुनील टिंगरे यांच्या नावाचा समावेश नाही. दरम्यान, नवाब मलिक यांची उमेदवारी रद्द करण्याचा दिल्लीत बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Congress Candiate List : काँग्रेसची यादी कधी जाहीर होणार? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं 

महायुतीच्या प्रलंबित जागावाटपाचा निर्णय घेण्यासाठी अमित शाह यांची काल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिल्लीत भेट घेतली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील भाजप नेत्यांकडून मलिकांना विरोध असल्याने कालच्या बैठकीत मलिकांच्या उमेदवारी संदर्भातही चर्चा झाली. अखेर नवाब मलिक यांच्या उमेदवारीला अमित शाह यांनीही विरोध दर्शवल्याचं समोर आलं.

मलिक यांची तुरुंगातून सुटका झाल्यावर त्यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हाही भाजपने विरोध केला होता. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून दाऊतशी संबंध असलेल्या मलिकांना सोबत घेऊ नये असे, असं म्हटलं होतं. मात्र, अजित पवारांनी मलिकांना सोबत घेतलं.

आदेशाचं पालन करा, अन्यथा कारवाई करू; सुप्रीम कोर्टाच्या अजितदादांना कडक सूचना 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाकडून मलिक निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. शरद पवारांसोबत असतांना मलिक यांनी अनेकदा भाजपवर हल्लाबोल केला. अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळं हा निर्णय घेतला जात असल्याचं बोलल्या जातं.

सना मलिकांना एबी फॉर्म…
अजित पवार गटाने मंगळवारी पक्षाच्या काही उमेदवारांना एबी फॉर्म दिले. यामध्ये मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनाही पक्षाने मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारीसाठी एबी फॉर्म दिला. मात्र, नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिला नाही. आता भाजपनेही उमेदवारीला विरोध केला. त्यामुळं नवाब मलिक आता काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube