Download App

Vidhansabha Election : ‘मावळा’त अजितदादाच्या उमदेवाराला भापजचा बूस्ट, शेळकेंचा प्रचार करणार

महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सुनील शेळकेंचा प्रचार करण्याच्या सूचना दिल्यानंतर कार्यकर्ते सक्रीय झाले.

  • Written By: Last Updated:

Vidhansabha Election : महायुतीकडून सुनील शेळके (Sunil Shelke) यांना मावळमधून उमेदवारी दिल्यानंतर भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे (Bala Bhegade) यांनी बंडखोरी केली. त्यांनी अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर मावळमध्ये राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या. दरम्यान, आता सुनील शेळके यांच्यासाठी भाजप कार्यकर्ते एकटवले आहेत.

आयुष्मान खुराना पुन्हा करणार धमाका, घेऊन येत आहे हॉरर-कॉमेडी ‘थामा’ 

मावळमध्ये अजित पवारांनी विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी दिली. त्यानंतर नाराज असलेल्या बापू भेगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बापू भेगडेंना महायुतीचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीही राजीनामा पाठिंबा जाहीर केला. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटानेही अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा दिलाय. दरम्यान, बाळा भेगडे यांच्या भूमिकेनंतर कार्यकर्ते संभ्रमात होते. मात्र महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सुनील शेळकेंचा प्रचार करण्याच्या सूचना दिल्यानंतर कार्यकर्ते सक्रीय झाले.

कोरोनाच्या लाटेत वाढला होता ‘हा’ घातक आजार; संशोधनातून धक्कादायक माहिती उघड 

आज भाजपच्या लोणावळा मंडल कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सर्व कार्यकर्ते व अधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय घेतला. लोणावळा मंडलचे शहराध्यक्ष अरुण लाड, माजी नगरसेवक देविदास कडू, जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यात बाळा भेगडे आमचे नेते आहेत. दैवत आहे. परंतु आम्ही संघटनेचे काम करू. पक्षाचे वरिष्ठ नेते जे आदेश देतील, ते आम्हाला मान्य करावेच लागणार. ज्या पद्धतीने लोकसभेत आम्ही महायुती धर्माचे पालन केले, तोच धर्म आता विधानसभेतही पाळू असं त्यांनी सांगितलं.

खासदार बारणेंचाही शेळकेंना पाठिंबा…
दरम्यान, शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही महायुतीचा धर्म पाळत आम्ही सुनील शेळकेंना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म सर्वांना पाळावा, असं आवाहन केलं. त्यानुसार आम्ही युतीचे काम करू. राज्यात महायुती असल्याने आम्ही निवडणुकीत युतीच्या नेत्याचं काम करण्याचं ठरवलं, असं बारणे म्हणाले.

follow us