Download App

निवडणुकीचा बिगुल वाजला, अजितदादा गटाची 37 उमेदवारांची यादी तयार, नगरमध्ये चार जागा मिळणार?

नगर जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदार असलेले मतदारसंघ आणि पारनेरची जागाही अजितदादा गटाला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

  • Written By: Last Updated:

Vidhansabha Election : विधानसभेची (Vidhansabha Election) आचारसंहिता जाहीर झाली, मतदानाची तारीखही निश्चित झाली. मात्र महायुती व महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार अद्याप ठरले नाहीत. मात्र, ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार आहे, ती जागा त्याच पक्षाला सुटणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्य (Ajit Pawar) राष्ट्रवादीने उमेदवारांची पहिली यादी तयार केल्याचे बोललं जातंय. त्यात नगर जिल्ह्यातील चार जागांसह 37 जागांचा समावेश आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, CRPF करणार व्हीआयपींची सुरक्षा, एनएसजी कमांडोंची ‘सुट्टी’! 

नगर जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदार असलेले मतदारसंघ आणि पारनेरची जागाही अजितदादा गटाला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बारापैकी चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचे संकेत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर नगर शहरातील आमदार संग्राम जगताप, अकोल्याचे डॉ. किरण लहमटे, कोपरगावचे आशुतोष काळे आणि पारनेरचे निलेश लंके हे अजितदादांसोबत गेले होते. मात्र, लोकसभेच्या तोंडावर लंकेंनी घरवापसी करत शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा लढवली आणि ते विजयी झाले. तेव्हापासून पारनेरची जागा रिक्त आहे.

दरम्यान, जेथे ज्यांचा आमदार आहेत, ती जागा त्यांनाच सुटेल असं जर महायुतीचे सुत्र ठरलं तर नगर जिल्ह्यातून राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप, आशुतोष काळे आणि किरण लहमटे यांची उमेदवारी निश्चित आहे. तर पारनेरची जागा अजितदादांना गटाला सुटल्यास तेथे विजय औटी, सुजित झावरे किंवा काशिनाथ दाते यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

नगर जिल्ह्यात 12 जागा
नगर जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार आहेत. तिथे त्यांचाच दावा राहिलं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाची नगरमध्ये एकही जागा नाही. त्यामुळं त्यांना कोणती जागा दिली जाते की, मिळणारच नाही? याकडेही लक्ष लागलंय.

नार्वेकर अ‍ॅक्शन मोडमध्ये ! ‘या’ चित्रपटात दिसणार खलनायकाच्या भूमिकेत 

मविआत दोन जागांवर तिढा…
दरम्यान, नगर शहर, श्रीगोंदा आणि पारनेर या तीन मतदारसंघांच्या वाटपावरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला. या तीनही जागांवर तिन्ही पक्ष जोर लावत आहेत. नगरचे आमदार आमदार संग्राम जगताप हे अजितदादा गटात गेल्यानं शरद पवारांकडे सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे या जागेसाठी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) आग्रही आहे.

पारनेरच्या जागेवर निलेश लंके हे राणी लंके यांच्या उमेदवारीसाठी जोर लावत आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना आश्वासन दिले आहे. तर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले हेही या जागेसाठी इच्छुक आहेत.

 

follow us