‘पिपाणी’ चिन्हाचा त्रास होऊ शकतो; पण, लोकसभेएवढा नाही; पवारांच्या नातवाला फुल्ल विश्वास
बारामती : निवडणूक आयोगाने काल (दि.15) मोठी घोषणा करत राज्यात विधानसभा निवडणुकांची (Assembly Election) घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्पात निवडणुका पार पडणार असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकांच्या घोषणेनंतर आता सर्वच पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे. या सर्व धामधुमीत शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांदरम्यान पिपाणी चिन्हाचा त्रास होऊ शकतो पण लोकसभेएवढा नाही असे विधान केले आहे. ते बारामतीत बोलत होते.
जरांगेंनी शड्डू ठोकला! मुलाखतींसाठी अंतरवालीत या; लढायचं की, पाडायचं यावर 20 तारखेला फैसला
निवडणुकीच्या चिन्हाबाबत बोलताना शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस हे नवीन होतं. लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हाखाली तुतारी असं नाव देण्यात आलं होतं. आता तुतारी ऐवजी तिथं पिपाणी लिहिण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अनेकांपर्यंत तुतारी नाव पोहोचलंय. पिपाणी चिन्हाचा त्रास विधानसभा निवडणुकीतही होणार आहे, पण लोकसभेएवढा त्रास होणार नसल्याचा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केलायं.
एका कार्डात मावणार नाहीत एवढी कामं; प्रगतीचा पाढा वाचत शिंदेंनी दिला ‘करेक्ट’ कार्यक्रमाचा इशारा
बारामतीबाबत शरद पवारांकडेच निर्णय :
बारामती मतदारसंघातून युगेंद्र पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. या मतदारसंघात अजित पवार विद्यमान आमदार असून त्यांच्याविरोधात युगेंद्र पवार यांना महाविकास आघाडीकडून रिंगणात उभे करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, बारामतीबाबत शरद पवार हेच निर्णय घेणार असून पुढील आठवडाभरात खुद्द शरद पवार यांबाबत घोषणा करणार असल्याचं युगेंद्र पवारांकडून सांगण्यात आलंय.
मागील अनेक दिवसांपासून शरद पवार गटाकडून राज्यभरात यात्रा काढण्यात आल्या होत्या. यामध्ये शिवस्वराज्य यात्रा, स्वाभिमानी यात्रा, आभार यात्रा अशा अनेक यात्रांच्या माध्यमांतून वाड्या-वस्त्यांवर फिरुन लोकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. या भेटीगाठींमध्ये बारामतीकरांसह राज्यातील जनता शरद पवार यांना विसरणार नाहीत, असा विश्वास आम्हाला असल्याचं युगेंद्र पवारांकडून स्पष्ट करण्यात आलंय. राज्यात सध्या अनेक प्रश्न समोर आहेत. राज्यात गुन्हेगारी, भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, महिलांवर अत्याचार या सर्व प्रश्नांवर आता आपल्याला काम करावं लागणार असल्याचंही युगेंद्र पवार यांनी सांगितलंय.
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तात्काळ जामीन मिळाल्याने पीडित कुटुंब संतप्त
दरम्यान, शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे दोन मागण्या केल्या होत्या. यामध्ये तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लहान आणि अस्पष्ट दिसत असून त्याचा आकार वाढवण्यात यावा. यासोबतच पिपाणी चिन्हावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. मात्र, निवडणुक आयोगाने यातील एकच मागणी मान्य केली असून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा आकार वाढवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा आकार मोठा दिसणार आहे.