Download App

झारखंडमध्ये तीन तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका? ‘या’ दिवशी होणार घोषणा

Maharashtra Election Announcement : हरियाणा आणि जम्मू काश्मीरनंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रा (Maharashtra) आणि झारखंडमध्ये

  • Written By: Last Updated:

Maharashtra Election Announcement : हरियाणा आणि जम्मू काश्मीरनंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रा (Maharashtra) आणि झारखंडमध्ये (Jharkhand) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे.

महाराष्ट्रा आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) तयारी पूर्ण केली असून कोणत्याही क्षणी विधानसभेची घोषणा होऊ शकते.  तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केल्याने या आठवड्यात दोन्ही राज्याच्या विधानसभेसाठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका?

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक किंवा दोन टप्प्यात मतदान होऊ शकते मात्र एकाच टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता जास्त असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

यावेळी राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या मदतीने महायुती पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर लोकसभा निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा महायुतीचा पराभव होणार असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. सध्या राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अनेक बैठका सुरु असून येत्या दोन – तीन दिवसात कोणता पक्ष कोणत्या जागेवर निवडणूक लढवणार याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांच्या हत्येनंतर सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधक जोरदार टीका करताना दिसत आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांडून करण्यात येत आहे.

झारखंडमध्ये तीन टप्प्यात मतदान?

झारखंडमध्येही एक ते तीन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, झारखंडमध्ये नक्षलग्रस्त भाग लक्षात घेऊन मतदानाचे टप्पे ठरवले जाणार आहे. सध्या झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचे सरकार असून भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याचा दावा करत आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election : विधानसभेसाठी राहुल गांधी ॲक्शन मोडमध्ये, ‘या’ नेत्यांसोबत करणार मिटिंग

तर दुसरीकडे नुकतंच हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका पार पडले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाले आहे तर हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपने सत्ता स्थापन केली आहे. हरियाणा निवडणुकीत भाजपला 90 पैकी 48 जागांवर विजय मिळाला आहे तर काँग्रेसने हरियाणामध्ये यावेळी 37 जागांवर विजय मिळावला आहे.

follow us