Download App

हातात बॅनर अन् शेकडोंचा जनसमुदाय; शंकर मांडेकरांनी भरला उमदेवारी अर्ज

भोर-राजगड-वेल्हा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केलायं.

Shankar Mandekar News : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस होता़. सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून अर्ज भरण्यात आले आहेत. अशातच भोर-राजगड-वेल्हा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलायं. यावेळी महायुतीतील घटक पक्षाचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

माझ्या कुटुंबीयांना दु:ख झालं, नऊ वर्षानंतर…’, अजित पवारांच्या गंभीर आरोपावर रोहित पाटलांची प्रतिक्रिया

यावेळी बोलताना मांडेकर म्हणाले, मी पहिल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय काम करणारा कार्यकर्ता आहे. आज महायुतीची उमेदवारी जरी मला मिळालेली आहे. मी महायुतीच्या उमेदवारीसाठी जे जे इच्छुक पदाधिकारी होते त्या सर्वांची भेट घेणार आहे. आम्ही सर्व जण एकदिलाने काम करणार आहोत.
त्याच विश्वासाने या निवडणुकीला मी सामोरा जाणार आहे. भोर राजगड मुळशीतील जनतेला परिवर्तन हवे आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून ह्या भागात परिवर्तन होणार असल्याचं मांडेकरांनी सांगितलंय.

मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; 5 उमेदवारांची घोषणा, कोणाला कुठून मिळाली संधी?

दरम्यान, भोरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मांडेकरांच्या रॅलीला सुरवात झाली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, चेअरमन भगवान पासलकर, संचालक भालचंद्र जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, माजी सभापती बाबा कंधारे, उपसभापती सारीका मांडेकर, नगरसेवक सुषमा निम्हण, युवक अध्यक्ष सागर साखरे, राजाभाऊ हगवणे, चंदा केदारी, केदार देशपांडे, कुणाल धुमाळ, राजेंद्र सोनवणे, पांडुरंग निगडे, कालिदास गोपालघरे, नगरसेवक प्रमोद निम्हण, श्रीकांत कदम, नंदूशेठ भोईर, गणपत जगताप, हरिदास कोकाटे, शिवाजी ढेबे , विक्रम बोडके, संग्राम निगडे, सुशिल हगवणे , मुळशी तालुका अद्यक्ष अंकुश मोरे, माऊली साठे आदी उपस्थित होते.

follow us