Download App

Rahul Jagtap : शरद पवारांची मोठी कारवाई, राहुल जगताप पक्षातून निलंबित

Rahul Jagtap : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये 'काटे की टक्कर' पाहायला मिळत आहे.

  • Written By: Last Updated:

Rahul Jagtap : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCPSP) मोठा निर्णय घेत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे (Srigonda Assembly Constituency) माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) यांना पक्षातून  निलंबित करण्यात आले आहे.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनुराधा नागवडे (Anuradha Nagwade) यांना उमेदवार जाहीर करण्यात आली आहे मात्र तरीही देखील या मतदारसंघात माजी आमदार राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवित आहोत. तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार हे अधिकृतरित्या निवडणूक लढवित आहेत. तसे असतानाही आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहात हे पक्षशिस्तीस धरून नाही म्हणून आपणास पक्षाकडून निलंबित करण्यात येत आहे. असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

आशुतोष काळेंचे काम एक नंबर, घड्याळाचे बटन एक नंबर आणि त्यांना मताधिक्य देखील एक नंबर द्या : सुनील गंगुले

माजी आमदार राहुल जगताप यांनी आघाडी धर्म न पाळता शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्यावर आरोप केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येत होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोठा निर्णय घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार राहुल जगताप यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

follow us