चिंचवड : चिंचवड मतदार संघातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वैयक्तिक गाठीभेटींवर आणि संवादावर भर दिला. गेले दहा दिवस मतदारसंघातील गावठाण, वस्त्यांसह उच्च्भ्रू सोसायट्यांपर्यंत पोहचत शहरातील विविध भागात बाईक रॅली, स्नेह मेळावे, कोपरा बैठका, जाहीर सभा, पदयात्रा, काढून कलाटे यांनी प्रचार केला.
पृथ्वीराज चव्हाण इतके मोठे आहेत की राहुल गांधी त्यांचे नाव घेत नाहीत, डॉ. अतुलबाबा भोसलेंचा घणाघात
प्रलंबित प्रश्न, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा रोजगार हिरावून गुजरातला नेणारे सरकार, सुविधांचा अभाव, टँकरचा भुर्दंड, ट्रॅफिकची समस्या असे मुद्दे प्रचारा दरम्यान सातत्याने कलाटे यांच्यासमोर मतदारांनी मांडले. कलाटेंनीही सर्वाना उत्तर देण्याचा प्रयत्न करत मतदारसंघासाठीचे आपले अभिवचन – व्हिजन नागिरकांसमोर मांडले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांच्या प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे अशी भावना यावेळी कलाटे यांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडीची वज्रमूठ, जेष्ठ नेत्यांचे चिंचवडवर लक्ष!
महायुती सरकारचा भ्रष्टाचारी चेहरा उघड करण्यासाठी मविआतील दिग्गज नेत्यांनी चिंचवडमध्ये हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा रोड शो आणि सभा निवडणुकीचे वातावरण पालटून गेला. याशिवाय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांनीही सभा घेऊन राहुल कलाटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून त्यांना एकदा संधी देण्याची विंनती मतदारांना केली.
शिवसेनेचे संजय राऊत, सचिन आहिर यांच्यासह काँग्रेस आणि आपच्या कार्यकर्त्यांनीही कोपरा सभा आणि बैठका घेऊन वातावरण ढवळून काढले.
राहुल कलाटेंचे सोसायट्यांना टँकरमुक्त करण्याचे आश्वासन, चिंचवडमध्ये भेटीगाठी व बैठका
कलाटेंना वाढता पाठिंबा !
राहुलदादांची लढावू वृत्ती अन विकासाचा ध्यास पाहुन शहरातील शेकडो संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. यामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकन पक्ष, छावा मराठा सेना महाराष्ट्र, पँथर आर्मी (स्वराज्य संविधान रक्षक सेना), बहुजन व्यासपीठ, क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी सामाजिक संघटना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डॉ राजेंद्र गवई), पिंपरी चिंचवड जनता दल, धनगर समाज महासंघ, मराठवाडा जनविकास महासंघ, ऑल इंडिया पॅन्थर सेना, ऑल इंडिया प्रोफेसर काँग्रेस कमिटी, अल्प संख्याक महासंघ, पिंपरी-चिंचवड सी.ए असोसिएशन इत्यादी संघटणांनी कलाटे याना पाठिंबा जाहीर केला.
तर राहुल कलाटे म्हणाले की, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी ठराविक भागाचा आणि व्यक्तींचा विकास करणे, त्यासाठी भ्रष्टाचार करणे आणि ठराविक भागात समस्या कायम ठेवण्याचे राजकारण वर्षानुवर्षे केले जाते. या वृत्तीला हटविण्यासाठी माझा संघर्ष आहे. चिंचवडच्या एका पिढीने पवार साहेब आणि काँग्रेस काळातला विकास बघितला. माझ्या पिढीने प्रलंबित प्रश्नांसाठी २० वर्षांहून अधिक काळ संघर्ष केला. पुढच्या पिढीसाठी चिंचवडचा विकास व्हायला हवा. चिंचवडची जनता सुज्ञ आहे. लोकांच्या चांगुलपणावर माझा विश्वास असल्याचं कलाटे म्हणाले.
विकेंडला मॅरेथॉन बैठका, सभा, पदयात्रा आणि रॅली
शनिवार-रविवार अशी सुट्टीची संधी साधत कलाटे यांनी बैठका, सभा, पदयात्रा आणि रॅलीचा अक्षरशः धडाका लावला. शनिवारी सांयकाळी ६ ते रात्री १० यावेळेत रावेत – किवळे – मामुर्डी या संपूर्ण परिसरात पदयात्रा व बाईक रॅली पार पडली. यासह वाल्हेकर वाडी, काकडे पार्क चिंचवड व तापकीर मळा काळेवाडी या तीन ठिकाणी डॉ अमोल कोल्हे यांच्या सभा पार पडल्या. रविवारी दिवसभर सोसायटी धारकांच्या बैठका, विविध समाज बांधवांचे स्नेह मेळावे व कोपरा सभा व भेटीगाठी घेण्यात आल्या.