महिलांना मोफत बस प्रवास, गॅस सिलेंंडर 500 रूपयांत; महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनाम्यात कोणती आश्वासने?
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी
Maharashtra Assembly Election Mahavikas Aghadi Manifesto : राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) अवघ्या 1o दिवसांवर येवून ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपला जाहीरनामा प्रकाशित केलाय. याला महाराष्ट्रनामा असं नाव देण्यात आलंय. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारा हा जाहीरनामा आहे, असा देखील उल्लेख महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलंय. या कार्यक्रमाला मल्लिकार्जुन खर्गे, मनोज सिंघवी पवन खेरा, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, संजय राऊत उपस्थित होते.
यावेळी मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, महाराष्ट्राची निवडणूक देशाचं बदलवणारी निवडणूक आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही निवडणूक महत्वाची आहे.मुंबईत देशाच्या विभिन्न भागातील लोकं आशा घेवून येतात. उपाशी मरणार नाही, काहीतरी काम मिळेल या आशेनं येतात.त्यामुळेच आमचा महाराष्ट्रनामा आज आम्ही जाहीर करत आहोत. खूप अभ्यास करून हे घोषणापत्र निर्माण करण्यात आलंय. -यापूर्वी आमच्या चार नेत्यांनी 5 गॅरंटीवर मुद्दे मांडले आहे. आज आमचं घोषणापत्र सविस्तर प्रकाशित करत आहोत, असं खर्गे म्हणाले आहेत. त्यांनी मुंबईचा दोन वेळा बॉंबे म्हणून उल्लेख केलाय.
वकीलांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध ; कराडमध्ये डॉ. अतुल भोसलेंनी दिला शब्द
महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये भविष्यातील महाराष्ट्राला पाहता पाच महत्त्वाचे मुद्दे आहेत. निरोगी महाराष्ट्र, उद्यमी महाराष्ट्र, पर्यावरण समृद्ध महाराष्ट्र, सर्व समावेशी महाराष्ट्र आणि सशक्त नागरी महाराष्ट्र या महत्त्वाच्या मुद्द्यांना स्थान देण्यात आलेले आहे. या जाहीरनाम्यात पहिल्या शंभर दिवसात करण्यात येणाऱ्या योजनांचा आणि उपाय योजनांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.
सत्तेत राहूनही रोजगार न देणारे विरोधक भावी पिढीचं काय भलं करणार? भरसभेत डॉ. अतुल भोसलेंचा सवाल
महालक्ष्मी अंतर्गत महिलांना प्रतिमहिना 3000 रुपये देणार आहेत. महिलांना बस प्रवास मोफत करण्यात येणार आहे. स्वयंपाकाचे सहा गॅस सिलेंडर प्रत्येकी 500 रुपये उपलब्ध करणार आहेत. महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचं महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात म्हटलंय. महाविकास आघाडीच्या या जाहीरनाम्यात महिला, शेतकरी, युवक शिक्षण,आरोग्य, उद्योग, व्यवसाय, सामाजिक न्याय, जनतेच्या हितासाठी, शहर विकास, सुशासन, महाराष्ट्राचा स्वाभिमान या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे.