वकीलांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध ; कराडमध्ये डॉ. अतुल भोसलेंनी दिला शब्द
Atul Bhosale Advocate Melava In Karad : कराडमध्ये महायुतीच्या (Mahayuti) प्रचार सभा वेगात सुरू आहे. भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले जाहीर सभा, प्रचार मेळाव्यांना हजेरी लावत आहेत. कराड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्यावतीने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याला डॉ. अतुल भोसले (Atul Bhosale) यांनी हजेरी लावली. यावेळी ते म्हणाले की, पुढील 30 वर्षांचा विचार करुन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सोयीसुविधा असणारी कराड येथे न्यायालयाची नवी सुसज्ज इमारत उभी करण्याचा माझा मानस आहे. तसेच कराड आणि पाटणसाठी ग्राहक आणि सहकार न्यायालय आणण्यासाठीही येत्या काळात विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजपा – महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
सत्तेत राहूनही रोजगार न देणारे विरोधक भावी पिढीचं काय भलं करणार? भरसभेत डॉ. अतुल भोसलेंचा सवाल
यावेळी कराड दक्षिणमधील वकील बंधू – भगिनींनी डॉ. अतुल भोसले यांच्याशी संवाद साधताना वकीलांना (Assembly Election 2024) भेडसावणाऱ्या समस्यांबाबत माहिती दिली. कराड येथील सध्याची न्यायालयाची इमारत अपुरी पडत असून, सर्व वकील बसतात ती जागादेखील अपुरी पडत असल्याचे सांगितले. तसेच याठिकाणी मोठ्या ग्रंथालयाची गरज असल्याचे मत वकील बांधवांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ. भोसले यांनी वकीलांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगून, मला संधी मिळाल्यास वकिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल’ मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे, या वकीलांच्या दीर्घकाळापासून सुरु असलेल्या मागणीच्या पूर्ततेसाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब देसाई, ॲड. दिपक थोरात, ॲड. विकास पवार, ॲड. आत्माराम पाटील, ॲड. रणजीत थोरात, खजिनदार ॲड. शुभम जाधव, सचिव ॲड. साईप्रसाद पाटील, ॲड. प्रविण घाडगे, ॲड. सी. बी. कदम, ॲड. दौलत इनामदार, ॲड. संदेश साळुंखे, ॲड. विजय पाटील, ॲड. वसंतराव मोहिते, ॲड. अनिल माळी, ॲड. तब्बसूम मुल्ला, ॲड. कविता लाड यांच्यासह बार असोसिएशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.