सत्तेत राहूनही रोजगार न देणारे विरोधक भावी पिढीचं काय भलं करणार? भरसभेत डॉ. अतुल भोसलेंचा सवाल

सत्तेत राहूनही रोजगार न देणारे विरोधक भावी पिढीचं काय भलं करणार? भरसभेत डॉ. अतुल भोसलेंचा सवाल

Atul Bhosle Sabha In Kasarshirambe : गेल्या दहा वर्षात विरोधकांनी या भागातील एकाही युवकाला काम दिले नाही. कराडच्या एम.आय.डी.सी.मध्ये ते नवीन उद्योग आणून रोजगार उपलब्ध करु शकले नाहीत. गेली 2 पिढ्या सत्तेत असूनही रोजगार निर्मिती करू न शकणारे विरोधक आपल्या भावी पिढीचे काय भले करणार, असा सवाल भाजपा-महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉ. अतुल भोसले (Atul Bhosle) यांनी केलाय. कासारशिरंबे (ता. कराड) येथे आयोजित जाहीर प्रचार (Assembly Election 2024) सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी धोंडीराम पाटील होते.

याप्रसंगी (Karad Dakshin) व्यासपीठावर सरपंच उमेश पवार, उपसरपंच संतोषराव यादव, सुदन मोहिते, माजी सरपंच बाबुराव यादव, कृष्णा बँकेचे संचालक संतोष पाटील, बाजार समितीचे माजी संचालक मिलींद पाटणकर, तानाजी यादव, ग्रामपंचायत सदस्य अमर पाटील, संजय यादव, बनकरराव पवार, बाबुराव माने, एकनाथ गायकवाड, राजाराम माने, भानुदास कचरे हे मान्यवर उपस्थित होते.

आधी लाडक्या बहि‍णींना भर सभेत धमकी नंतर जाहीर माफी, धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?

डॉ. अतुल भोसले यांच्या कासारशिरंबे येथील जाहीर सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मतदारांशी संवाद साधताना डॉ. अतुल भोसले पुढे म्हणाले, की विद्यमान लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षात आपल्या मतदारसंघात येऊन किती वेळा लोकांची विचारपूस केली? विरोधकांच्या व्यासपीठावरुन सतत माझ्या माताभगिनींचा अपमान होतोय, पण विद्यमान लोकप्रतिनिधी त्याबद्दल अवाक्षरही काढत नाहीत, याचे मला वाईट वाटते. दरवेळेप्रमाणे यावेळेलाही विरोधकांकडून कृष्णा कारखाना, कृष्णा हॉस्पिटल, चॅरिटेबल ट्रस्टबाबत टीका होत आहे. पण लोकसुद्धा विरोधकांच्या या टिकेला आता कंटाळले आहेत.

लाडक्या बहि‍णींना 1500 ऐवजी 2100 रूपये, शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना; भाजपच्या संकल्पपत्रात नेमकं काय?

याउलट आम्ही सदैव विकासाची कास धरुन कराड दक्षिणमध्ये महायुती (Mahayuti) सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी आणला. कृष्णा समूहाच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, रोजगारनिर्मितीसाठी मोठे काम सुरु आहे. शिरवळ येथे लवकरच कृष्णा विश्व विद्यापीठाची नवी शाखा सुरू होत असून, दोन वर्षात हा प्रकल्प उभा करून मतदारसंघातील अडीच हजार तरुणांना याठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याचा आमचा मानस आहे. शासनाच्या लाडकी बहिण योजना, बांधकाम कामगार योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी मी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी, भावांनी तसेच ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिकांनी मला भरघोस मतांचा आशीर्वाद देऊन, आपली सेवा करण्याची संधी द्यावी, असं आवाहन डॉ. भोसलं यांनी केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube