Download App

अतुल भोसलेंसाठी खुद्द अमित शहा मैदानात; पृथ्वीराज चव्हाणांना धडकी

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपचे नेते अमित शहांची उद्या कराडमध्ये तोफ धडाडणार आहे.

Assembly Election : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच कराड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल भोसले (Atul Bhosle) यांच्यासाठी खुद्द केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) मैदानात उतरले आहेत. उद्या 8 नोव्हेंबरला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात अतुल भोसलेंच्या प्रचारार्थ अमित शाह यांची जाहीर सभा पार पडणार आहे. कराड मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे विद्यमान आमदार असून भोसलेंच्या प्रचारार्थ अमित शहांची सभा असल्याने पृथ्वीराज चव्हाण यांना धडकी भरली असल्याची चर्चा साताऱ्यात रंगलीयं.

शरद पवारांवर केलेल्या टीकेचा आ. आशुतोष काळेंकडून निषेध, म्हणाले, ‘ वाचाळवीरांनी भान राखून…’

महाराष्ट्र काबिज करण्यासाठी भाजपकडून मास्टरप्लॅन आखण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यांच्या जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलंय. उद्या 8 नोव्हेंबरला अमित शाह यांची कोल्हापुर, सातारा, सांगली जिल्ह्यात सभा पार पडणार आहे. यामध्ये शिराला मतदारसंघात सकाळी 11 वाजता, कराड दक्षिण मतदारसंघात दुपारी 12 : 30 वाजता, सांगली मतदारसंघात दुपारी 2 : 15 वाजता तर इचलकरंजी मतदारसंघात 4 वाजता जाहीर सभा पार पडणार आहे.

नवी खेळी! काही योजनांमध्ये फेरफार करणार ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंचा वचननामा जाहीर

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभेत काँग्रेसशिवाय इतर कोणत्याही पक्षाचा आजवर विजय झालेला नाही. मात्र यंदा काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात भाजपकडून कडवं आव्हान निर्माण झालंय. भाजपकडून अतुल भोसले यांना उमेदवारी देण्यात आली असून यंदा कराडमध्ये अतुल भोसलेंसाठी अनुकूल वातावरण असल्याचं बोललं जात आहे. कारण माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचा गट पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहे.

शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का?; सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 8, अमित शहा 20, नितीन गडकरी 40, देवेंद्र फडणवीस 50, चंद्रशेखर बावनकुळे 40, तर योगी आदित्यनाथ 15 सभा घेणार आहेत. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रचाराचा धडाका आणि प्रचारांमधून टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

follow us