Sanjay Raut On Devendra Fadnavis : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवाजी पार्कवर होत असलेल्या दसरा मेळाव्यात (Dasara Melava) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हरियाणा विधानसभा (Haryana Election) निवडणुकीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात निवडणुका होऊ द्या, तुमच्या छातीची हवा टाचणी मारून कमी करतो असा टोला या मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लावला.
या मेळाव्यात बोलताना संजय राऊत म्हणाले की, हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीस म्हणाले की, आम्ही हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात ही विजय मिळवणार. छाती फुगवून इथे चालतायत मात्र निवडणुका होऊ द्या तुमच्या छातीची हवा टाचणी मारून कमी करतो असा टोला यावेळी बोलताना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लावला तसेच हरियाणा निकालाच्या दिवशी काँग्रेस पक्ष 10 वाजेपर्यंत 72 जागांवर आघाडीवर होता मात्र संध्याकाळी भाजपने सत्ता स्थापन केली. भाजपला 39.9 टक्के मते मिळाली तर काँग्रेसला 39. 3 टक्के मतदान मिळाला मात्र फक्त 0.3 टक्केमुळे भाजपला 30 जागांचा फायदा झाला मात्र 0.3 टक्केमुळे 30 जागांचा फायदा होऊ शकत नाही. ईव्हीएम घोटाळ्यामुळे हरियाणामध्ये काँग्रेसचा पराभव झाला असा आरोप देखील यावेळी संजय राऊत यांनी लावला.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, आझाद मैदानात चोरांचा मेळावा भरला आहे. मैदानाचा नाव आझाद मैदान आहे मात्र व्यासपीठावर सगळे मोदींचे गुलाम आहे. त्या आझाद मैदानाची लाज राखा, गुलामांचा मेळावा आणि आझाद मैदान नाव. त्यांनी खरं म्हणजे हा मेळावा सुरतला घेतला पाहिजे होता कारण त्यांच्या पक्षाचा जन्म महाराष्ट्रात झाला नसून सुरतच्या गर्भातून झाला. अशी टीका देखील यावेळी शिंदे गटावर संजय राऊत यांनी केली.
2 महिन्यांनी शिवसेनेचा CM असेल, राऊतांच्या पुन्हा मुख्यमंत्री पदावर दावा अन् तुफान फटकेबाजी
तसेच दोन महिन्यानंतर जेव्हा आपलं सरकार येणार तेव्हा आपण त्यांना सांगू तुम्ही हा मेळावा गुजरातला घ्या कारण तुमचा जन्म तिकडे झाला आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने मोदी आणि शहाचा दारुण पराभव केला. त्यामुळे हा दसरा मेळावानसून विजय मेळावा आहे असं देखील यावेळी संजय राऊत म्हणाले. तसेच दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा विजय मेळावा घ्याचा आहे आणि त्यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्यासपीठावर असेल असेही संजय राऊत म्हणाले.