Video : लाडक्या बहीणींनो 1500 रूपये कचकून घ्या: शिंदे-फडणवीस फक्त पोस्टमन; अंधारे बरसल्या
मुंबई : एकीकडे राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेवरून (Ladaki Bahin Yojana) राजकारण सुरू असतानाच ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात शिनसेना नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andahre) जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच लाडक्या बहीणींनो 1500 रुपये कचकून घ्या असा सल्ला दिला आहे. लाडक्या बहिणांनी 1500 रुपये कचकून घेतले पाहिजे, हे पैसे काही फडणवीसांनी नागपूरचा बंगला विकून किंवा मुख्यमंत्र्यांनी तापोळ्याची जमीन विकून दिले नाही. आमच्या राज्यातील नागरिकांनी जो टॅक्स भरला त्याचे हे पैसे आहे. ते सरकारचे पैसे असून, पैसे वाटणारे फक्त पोस्टमन आहेत त्यामुळे राज्य सरकाने या योजनेचे मोक्कार क्रेडिट घ्यायचे नाही. (Sushma Andhare Speech In Dasara Melava)
“फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र फडणवीस, त्यांनीच..”, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल!
सरसंघचालकांनी फडणवीसांचे कान टोचावे
आम्हाला हा महाराष्ट्र शांत हवा आहे. सांप्रदायिक विभाजन नको आहे. पण फडणवीसांनी राज्यात द्वेषाचे राजकारण केले. त्यामुळे सरसंघचालकांनी देवेंद्र फडणवीसांना सल्ला द्यावा अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. फडणवीसांनी माणसातला माणूस ठेवला नाही असेही अंधारे म्हणाल्या. फडणवीस म्हणजे फेक नरेटिव्हचं महाकेंद्र आहे. राज्यात द्वेष पसरवण्यासाठी कोकणमधील न चालणारी चिल्लर, जी बाजारातून रद्द झाली आहे, असे चारआणे बाराआणे इथे बाजारात आणता. ही चिल्लर इथे द्वेषाचे राजकारण करत असेल तर सरसंघचालक देवेंद्र फडणवीसांचे कान टोचण्याची मागणी अंधारे यांनी मोहन भागवत यांनी केले आहे. चाराणे बाराणे हिंदु मुस्लिम वाद लावतात. पण त्याला राज्यातली जनता बधली नाही असे अंधारे म्हणाल्या.
“बहिणींना माहिती, भाऊ लबाड आहे”; आमदार भास्कर जाधवांची सरकारवर खोचक टीका
छत्रपतींचा पुतळा पडतो, ही दुर्दैवी घटना
पुढे उपस्थितांना संबोधित करताना अंधारेंनी सिंधुदुर्गमधील रोजकोट किल्ल्यावरील कोसळलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यावरूनही जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, महापुरूषांची अस्मिता तुम्हाला काही वाटत नाही. या लोकांनी इंदू मिलचं स्मारक उभं केलं नाही, छत्रपतींचे स्मारक उभारलं नाही. राजकोट किल्ल्यावर छत्रपतींचा पुतळा कोसळतो, ही दुर्दैवी घटना असून, लोकसभा निवडणुकीत श्रीरामाने यांना पाडले. आता विधानसभा निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांना पाडणार असे म्हणत अंधारेंनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
बातमी अपडेट होत आहे…