लाडकी बहीण योजना सुपरहिट, विरोधकांची तोंड काळी झालीत, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

लाडकी बहीण योजना सुपरहिट, विरोधकांची तोंड काळी झालीत, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

Eknath Shinde On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुपरहिट झाली आहे आणि विरोधकांची तोंड काळी झालीत. अशी टीका मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर केली आहे. माध्यमांशी बोलताना मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज आम्ही लाडकी बहीण योजनेतून 2 कोटी 30 लाख माझ्या बहिणीच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हफ्ता पाठवला आहे. मात्र काही लोक म्हणत होते आचार संहितेपूर्वी ही योजना बंद पडणार आहे पण आमची देण्याची वृत्ती आहे आणि आमचं सरकार लाडक्या बहिणींच्या मागे उभे रहाणारे सरकार आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आमचं सरकार लाडक्या बहिणींच्या मागे उभे रहाणारे सरकार आहे म्हणून आम्ही ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे लाडक्या बहिणींचे खात्यात एका क्लिकवर दिले आणि आमचं सरकार बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारे सरकार आहे, हफ्ते घेणारे सरकार नाही असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लावला तसेच विरोधकांची तोंड आता काळी झालीत. आशाताई भोसले यांनी देखील विरोधकांना चांगली चपराक दिली आहे. खोडा घालणारे कुणीही येउद्या ही लाडकी बहीण योजना सुरूच राहील अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

तसेच ही योजना यशस्वी राबवण्याची सरकारने जबाबदारी घेतली आहे आणि गरिबांच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावू नका. या योजनेत कुणी खोडा घातला तर येणाऱ्या निवडणुकीत लाडक्या बहिणी तुम्हाला खोडा घातल्या शिवाय राहणार नाहीत असं देखील माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

… तर मी दोनवेळ जेवू शकले असते : आशा भोसले

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने मराठी भाषा विभागाच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना आशा भोसले म्हणाल्या होते की, राज्य सरकारने लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये दिले आहे त्यांची व्यथा आणि त्यांची खुशी माझ्याशिवाय आणखी कोणाला कळणार नाही. हे काम जर 1947 कोणी केलं असतं तर तेव्हा मला 1500 रुपये मला मिळाले असते, तर मी दोनवेळ जेवू शकले असते.

नगरकरांनो सावध रहा, पुढील 3 दिवस जिल्ह्यात धो धो पाऊस, अलर्ट जारी

तेव्हा मला कोणी 1500 रुपये दिले असते तर मी सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं. मी अन्न साठवून ठेवायचे. मी दुपारी जेवू शकत नव्हते, जेव्हा माझे पती घरी यायचे तेव्हा आम्ही एकत्र जेवायचो असेही या कार्यक्रमात बोलताना आशा भोसले म्हणाल्या होत्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube