Devendra Fadnavis Criticized Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. येथे त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या गॅरंटी लाँच केल्या. याचवेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती टीका केली. भाजप आणि आरएसएसचे लोक संविधानावर हल्ला करत आहेत. त्याला संपवण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु, हा हल्ला फक्त संविधानावर नाही. हा हल्ला देशातील नागरिकांच्या अधिकारांवर हल्ला आहे, अशा शब्दांत राहुल गांधींनी टीका केली होती. त्यांच्या याच टीकेवर आज देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नौटंकीला आता जनता भुलणार नाही, अशा शब्दांत फडणवीसांनी राहुल गांधींना उत्तर दिलं.
धमक असेल तर, समोरून हल्ला करा; आरएसएसच्या होमग्राउंडवर जाऊन राहुल गांधींचा जोरदार घणाघात
देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.फडणवीस म्हणाले, भारताच्या संविधानाबद्दल काल राहुल गांधींची जी अनास्था दिसली. मी परवा जो आरोप केला होता तो अगदी खरा ठरला. ते लाल पुस्तक घेऊन संविधानाचा गौरव करू इच्छित नाहीत तर त्यांच्यासोबत असलेलं जे अर्बन नक्षल आहे यांना एक प्रकारचा इशारा देण्यासाठी किंवा त्यांची मदत घेण्यासाठी त्यांनी ही सगळी नाटकं आणि नौटंकी केली आहे. राहुल गांधी रोजच संविधानाचा अपमान करत आहेत. आजपर्यंत काँग्रेसने ज्या पद्धतीनं संविधानाचा अपमान केला. आता त्यांच्या या नौटंकीला कुणीच भुलणार नाही.
भाजप आणि आरएसएसचे लोक संविधानावर हल्ला करत आहेत. त्याला संपवण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु, हा हल्ला फक्त संविधानावर नाही. हा हल्ला देशातील नागरिकांच्या अधिकारांवर हल्ला आहे. त्यामुळे आपल्याला याची रक्षा करायची आहे. तसंच, आरएसएस समोरून संविधानावर हल्ला करत नाही. कारण ते समोरच्या लढाईला भितात. ते वेगवेगळ्या माध्यमातून हल्ला करतात. त्यामध्ये विकास, प्रगती, देशहीत असे शब्द वापरून हल्ले करतात. परंतु, त्यांच्यामध्ये समोर येऊन वार करण्याची धमक नाही. जर येत असतील तर आम्ही तयार आहोत या असं म्हणायला असही राहुल गांधी यावेळी म्हणाले होते.
एक कार्यालय पाहिलं. इतकी जमीन कुठून आली? कुणी दिले पैसे? यासाठी छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थानवरून पैसे आले असतील. गुजरातवरून फंड येत असेल असा टोलाही राहुल यांनी आरएसएसच्या कार्यालयावरून लगावला. तसंच, आपण यांच्या छुप्या अजेंठ्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेलं असंही राहुल गांधी म्हणाले होते.
फडणवीसांनी तुम्हाला ठेका दिलायं का? ठाकरेंच्या सवालावर जरांगेंचा प्रतिप्रश्न