धमक असेल तर, समोरून हल्ला करा; आरएसएसच्या होमग्राउंडवर जाऊन राहुल गांधींचा जोरदार घणाघात

  • Written By: Published:
धमक असेल तर, समोरून हल्ला करा; आरएसएसच्या होमग्राउंडवर जाऊन राहुल गांधींचा जोरदार घणाघात

Rahul Gandhi Nagpur Sanvidhan Sanman Sammelan : ज्या संविधानाची आपण सुरक्षा आज करत आहोत त्या संविधानातील विचार हे हजारो वर्ष जूने आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले आहेत तेच विचार गौतम बुद्धांनी मांडले, (Rahul Gandhi ) महात्मा गांधींनी मांडले, ज्योतीबा फुलेंनी मांडले, सावित्रीबाई फुले यांनी मांडले. त्याच विचारांचं रक्षण आपल्याला करायचं आहे अशा शब्दांत राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील प्रचार दौऱ्याची सुरूवात केली. ते नागपूर येथे संविधान मन्मान मेळाव्यात बोलत होते. यावेळी राहुल गांधींनी आरएसएस आणि भाजपवर जोरदार घणाघात केला.

भाजप आणि आरएसएसचे लोक संविधानावर हल्ला करत आहेत. त्याला संपवण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु, हा हल्ला फक्त संविधानावर नाही. हा हल्ला देशातील नागरिकांच्या अधिकारांवर हल्ला आहे. त्यामुळे आपल्याला याची रक्षा करायची आहे असंही ते म्हणाले आहेत. तसंच, आरएसएस समोरून संविधानावर हल्ला करत नाहीत. कारण ते समोरच्या लढाईला भितात. ते वेगवेगळ्या माध्यमातून हल्ला करतात. त्यामध्ये विकास, प्रगती, देशहीत असे शब्द वापरून हल्ले करतात. परंतु, त्यांच्यामध्ये धमक नाही की समोर येऊन वार करण्याचे. जर येत असतील तर आम्ही तयार आहोत या असं म्हणायला असही राहुल गांधी यावेळी म्हणाले आहेत.

Video : दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर सतेज पाटलांचा उद्रेक

यावेळी राहुल गांधी यांनी नागपूर येथील आरएसएस कार्यालयावरही भाष्य केलं. ते म्हणाले एक कार्यालय पाहिलं. इतकी जमीन कुठून आली? कुणी दिले पैसे? यासाठी छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थानवरून पैसे आले असतील. गुजरातवरून फंड येत असेल असा टोलाही राहुल यांनी यावेळी लगावला आहे. तसंच, आपण यांच्या छुप्या अजेंठ्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेलं असंही ते म्हणाले आहेत. त्याचवेळी राहुल गांधी यांनी जातीय जनगणनेवरूनही भाष्य केलं आहे.

जातीय जनगणणना ही एक नाव आहे. परंतु, त्याचा खरा अर्थ हा न्याय असा आहे. या देशातील 90 टक्के लोकांकडे काही सत्ता नाही. त्यांच्याकडे काही आर्थिक सत्ता नाही.  सध्या काही सत्ता नसताना, काही पैसे नसताना, आदर करण्याचा काय अर्थ आहे? जो एकवेळच्या जेवणासाठी हिंडतोय. त्याला काही रोजगार नाही तर त्याला आदर देऊन काय फायदा? असा प्रश्न उपस्थित करत या लोकांना रोजगार द्या, काम द्या, त्यांना काही पैसे मिळूद्या असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या