Video : दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर सतेज पाटलांचा उद्रेक
Vidhansabha Election : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती (Madhurimaraje Chhatrapati) यांनी आज माघारी घेतली. हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील (Satej Patil) यांना मोठा धक्का आहे. दरम्यान, मुधरिमाराजे यांनी माघार घेतल्यानं सतेज पाटील चांगलेच संतापले.
पालघरमध्ये मंत्री रविंद्र चव्हाणांची खेळी; अनेक जण पक्षात घेत भाजपची ताकद वाढवली !
दम नव्हता तर उभं राहायचंचं नव्हंत ना, मग मी पण माझी ताकद दाखवली असती, अशा शब्दात सतेज पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला.
कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी त्यांची उमेदवारी शेवटच्या क्षणी मागे घेतली. त्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटलांनी संताप व्यक्त केला. #SatejPatil #Kolhapur #MaharashtraAssemblyElection #MaharashtraPolitics pic.twitter.com/IF4OnocbRP
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) November 4, 2024
कोल्हापूर उत्तरमधून विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचं तिकीट कापून कॉंग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसची उमेदवारी बदलण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. नाराज उमेदवारांनी आणि माजी नगरसेवकांनी खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्याकडे उमेदवारी बदलण्यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळं राजेश लाटकर यांची उमेदवारी बदलून मधुरिमाराजे छत्रपती यांचं नाव जाहीर करण्यात आलं. त्यामुळं नाराज लाटकर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता.
माहिममध्ये मोठा ट्विस्ट! भाजप अन् मनसैनिकांची मनधरणी निष्फळ, सदा सरवणकर रिंगणातच…
काँग्रेस नेत्यांनी लाटकर यांची मनधरमी कऱण्याचं काम केलं. मात्र, शेवटपर्यंत काँग्रेस नेत्यांना लाटकर यांचे बंड शेवटपर्यंत शमवता आले नाही. काहीही झालं तरी लाटकर निवडणूक लढवण्यावर ठाम होते. लाटकर यांनी आजही अर्ज मागे न घेतल्याने काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मधुरिमाराज छत्रपती यांनी शेवटच्या क्षणी आपले नाव मागे घेतले आहे. अर्ज मागे घेण्यास काही मिनिटे शिल्लक असतांनाच त्यांनी आपला अर्ज मागे घेतला.
शाहू महाराज काय म्हणाले?
अर्ज माघारीसाठी अवघे काही मिनिटे शिल्लक असताना मधुरिमाराजे यांनी स्वत:हून कोल्हापूर उत्तर निवडणुकीतून माघार घेतली. त्यावर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मधुरिमाराजेंना नाईलाजाने माघार घ्यावी लागली, असे शाहू महाराजांनी म्हटले आहे. राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही. ते चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळं अशा परिस्थितीत निवडणूक लढायची नाही, असं आम्ही ठरवलं, असंही शाहू महाराज म्हणाले.
दरम्यान, या सर्व प्रकारानंतर सतेज पाटील संतापले. मला तोंडघशी पाडलं, दम नव्हता तर उभं राहायचंचं नव्हंत ना, मग मी पण माझी ताकद दाखवली असती, अशा शब्दात सतेज पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर आता मधुरिमाराजे काय प्रतिक्रिया देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.