माहिममध्ये मोठा ट्विस्ट! भाजप अन् मनसैनिकांची मनधरणी निष्फळ, सदा सरवणकर रिंगणातच…

माहिममध्ये मोठा ट्विस्ट! भाजप अन् मनसैनिकांची मनधरणी निष्फळ, सदा सरवणकर रिंगणातच…

Mahim Assembly Constituency : मुंबईतील माहिम मतदारसंघात (Mahim Assmbly Constituency) मोठा ट्विस्ट समोर आलायं. माहिम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) रिंगणात उतरले आहेत. तर ठाकरे गटाकडून महेश सावंत रिंगणात आहेत. अशातच पहिल्यांदाच राज ठाकरे सुपूत्र मैदानात उतरले असल्याने सदा सरवणकरांनी माघार घ्यावी, असा सूर भाजपचे नेते आणि मनसैनिकांकडून लावण्यात आला. मात्र, निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सदा सरवणकरांचा (Sada Sarvankar) अर्ज कायम ठेवण्यात आलायं. त्यामुळे माहिममध्ये ठाकरे गटाचे सावंत, महायुतीकडून सदा सरवणकर आणि मनसेकडून अमित ठाकरे यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय.

एखाद्या अधिकाऱ्याला टार्गेट करणं, कॉंग्रेसला महागात पडू शकतं; रश्मी शुक्लांच्या बदलीवरून आशिष शेलार आक्रमक

माहिम मतदारसंघात शिंदे गटाचे सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आपले शिलेदार स्वबळावर रिंगणात उतरवलेत. राज ठाकरे यांच्या घराण्यातून पहिल्यांदाच अमित ठाकरे निवडणुकीला उभे असल्याने भाजपचे नेते, शिंदे गटाच्या नेत्यांसह मनसैनिकांकडून सरवणकरांनी माघार घ्यावी, असं सांगण्यात येत होतं. या मतदारसंघातून अमित ठाकरे स्वत: निवडणूक लढवणार असल्याने माहिम मतदारसंघाची राज्यभरात चर्चा सुरु होती. अखेरच्या दिवसापर्यंत सरवणकर निवडणूक लढवणार आहेत की नाही? याबाबत शंकाकुशंका होती, अखेर खुद्द सदा सरवणकर यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट शब्दांत सांगितल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळालायं.

राज ठाकरे यांनी भेट नाकारलीयं, तर मी काय करणार…
भाजपसह शिंदे गटात माहिम मतदारसंघातून सदा सरवणकरांनी निवडणूक लढवावी की नाही, याबाबत चर्चा सुरु होती. सरवणकरांनी माघार घ्यावी, असाच आग्रह शिंदे गटासह भाजपचा दिसून येत होता. यासंदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी सदा सरवणकरांचं सुपूत्र गेले देखील होते, मात्र, राज ठाकरे यांनी भेट नाकारली. एवढचं नाही तर मला सरवणकरांशी काहीही बोलायचं नाही, निवडणुकीतून अर्ज मागे घ्यायचा असेल तर घ्या नाही तर निवडणूक लढा, असं राज ठाकरे यांनी सांगितल्याचा दावा सदा सरवणकरांनी केलायं. आता राज ठाकरेंनीच भेट नाकारल्याने मी तरी काय करणार, मी निवडणूक लढवणार असल्याचं सदा सरवणकरांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय.

दिवाळीच्या रंगात ‘जंतर मंतर छूमंतर’ होरर कॉमेडीची घोषणा; येत्या १० जानेवारी ला होणार सर्वत्र प्रदर्शित

सदा सरवणकर यांना पुन्हा माहिममधून शिंदे गटाने उमेदवारी दिली असून आपण महायुतीचे उमेदवार आहोत. त्यामुळे निवडणूक लढवणार असल्याचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालंय. भाजपच्या अनेक नेत्यांसह शिंदे गटातील नेते आणि मनसैनिकांकडून त्यांच्यावर माघार घेण्याबाबत दबाव टाकला जात असल्याची परिस्थिती होती. सदा सरवणकरांनीही माघारीसाठी इच्छा दर्शवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही याबाबत हीच भूमिका होती, मात्र, राज ठाकरेंनी भेट नाकारल्याने आपण आता निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, माहिम मतदारसंघातून ठाकरे गटाकडून महेश सावंत तर मनसेकडून अमित ठाकरे आणि महायुतीकडून सदा सरवणकर रिंगणात आहेत. या मतदारसंघात शिंदे गटासह ठाकरे गट आणि मनसेची मोठी ताकद आहे. त्यामुळे आता माहिम मतदारसंघ कोणाचा? याचं उत्तर यंदाच्या निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube