एखाद्या अधिकाऱ्याला टार्गेट करणं, कॉंग्रेसला महागात पडू शकतं; रश्मी शुक्लांच्या बदलीवरून आशिष शेलार आक्रमक

एखाद्या अधिकाऱ्याला टार्गेट करणं, कॉंग्रेसला महागात पडू शकतं;  रश्मी शुक्लांच्या बदलीवरून आशिष शेलार आक्रमक

प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी लेट्सअप मराठी 

Ashish Shelar Reaction On Rashmi Shukla Transfer : विधानसभा निवडणुकीतील (Vidhan Sabha Election) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष बंडोबांना थंड करण्यामध्ये व्यस्त आहे. संध्याकाळ पर्यंत निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची बदली केल्यामुळे महावीकास आघाडीला ऐतज कोलीत मिळाले आहे. महाविकास आघाडीने महायुतीवर निशाणा साधला आहे.

त्यासंदर्भात आपण न्यायालयात जाणार असल्याचे माहिती भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी (Ashish Shelar) पत्रकार परिषदेत दिली आहे.राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने बदली केलीय. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकार दिले आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून रश्मी शुक्ला यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांना हटवण्यात यावी अशा प्रकारची मागणी वारंवार केली जात होती. त्या मागणीला यश आल्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.

बंडखोर उमेदवारांना महाविकास आघाडीचा शेवटचा इशारा; जरांगे पाटलांच्या निर्णयावर काय म्हणाले पवार?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटविण्यात यावी अशी मागणी केली होती. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यातील हिंसाचार वाढलाय. विरोधी पक्षातील नेत्यांना धमकवण्यात असल्याचा आरोप त्यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाला कळवले होते. तसेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे देखील पात्रात म्हटलं होतं पत्राच्या माध्यमातून नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यामुळे त्यांना हटवण्यात यावी अशी प्रकारची मागणी ते करत होते.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला त्याच आम्ही स्वागत करतो. अशा प्रकारच्या निर्णयामुळे भ्रष्ट मार्गाने निवडणुका घेण्याचा भाजपाचा कट निवडणूक आयोगाने उधळून लावला आहे. तसेच रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याची गरज काय, तसेच कोणती मजबुरी होती असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला. रश्मी शुक्ला यांची सेवा संपुष्टात येऊन देखील त्यांना मुदत वाढ देऊन निवडणुका जिंकण्याचा कट देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा असल्याचा वडेट्टीवार यांनी केला आहे. त्याची नियुक्ती पारदर्शक निवडणूकित खोडा टाकणारी होती. यासाठी महाविकास आघाडीकडून त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता, असो देर आये पण दुरुस्त असं वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

नगरमध्ये मोठी घडामोड! ऐन निवडणुकीच्या काळात गांधी-जगताप कुटुंब एकत्र; संग्राम जगतापांची ताकद वाढणार?

विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदला उशीर झाला आहे. त्या भाजपासाठीच काम करत होत्या, असा आमचा ठाम विरोध होता. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी संजय राऊत,, नाना पटोले, एकनाथ खडसे यांचे फोन टॅपिंग केले होते. त्या संदर्भात त्यांच्यावरती गुन्हे दाखल होते, कारवाई सुरू होती. या सर्व कारवाई टाळण्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाची मदत घेतली. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाला मदत केली. नुकत्याच खाते अंतर्गत झालेल्या बदल्या देखील राजकीय हेतूने प्रेरित आहे, त्यामुळे त्या बदल्यांचा देखील पुन्हा विचार झाला पाहिजे असं मत दानवे यांनी व्यक्त केलं आहे.

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीवर प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, समाजात एखाद्या अधिकाऱ्याला टार्गेट करणे काँग्रेसला भारी पडू शकतं. निवडणूक आयोग निष्पक्ष भूमिका घेत आहे, हे आता तरी मान्य आहे का? असा सवाल अशी शेलार यांनी काँग्रेसला विचारला आहे. पुरावे द्या, अन्यथा निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार. आरोप करत असताना फडणीस यांना बदनाम करत असेल तर पुरावे सादर करा, अन्यथा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बदनामी अंतर्गत तक्रार करणारा असा इशारा आशिष शेलार यांनी नाना पटोले यांना दिला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube