Rashmi Shukla : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांबद्दल जाणून घ्या…

Rashmi Shukla : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांबद्दल जाणून घ्या…

Rashmi Shukla : बेधडक आयपीएस अधिकारी अशी ओळख असलेल्या रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक झाल्या आहेत. 2020 मध्ये याच रश्मी शुक्लांचं फोन टॅपिंग प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलंच गाजलं. त्यामुळे शुक्ला यांच्या करिअरबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

Pune Lok Sabha : पुणे लोकसभेचा उमेदवार ठरला? बावनकुळेंनी स्पष्ट सांगूनच टाकलं

रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1965 ला मुंबईत झाला. सुरुवातीच्या शिक्षण त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स स्कूलमधून घेतलं. त्यानंतर एलफिस्टन कॉलेजमधून ग्रॅज्युएशन आणि मुंबई युनिव्हर्सिटीतून त्यांनी मास्टर्स कम्प्लीट केलं. आणि याचवेळी त्यांनी यूपीएससीची तयारी केली. 1988 मध्ये सिविल सर्विस परीक्षा क्रॅक करत त्यांची निवड आयपीएस म्हणून झाली. यामध्ये त्यांना महाराष्ट्र हेच कॅडर मिळालं.

मुख्यमंत्र्यासमोर प्रशांत दामले म्हणाले, ‘मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, कारण..’

त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलीसमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केलं. त्यामध्ये औरंगाबाद ग्रामीण, नाशिक ग्रामीण, सातारा, पुणे ग्रामीण या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलं. त्याच बरोबर त्या मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, नागपूर आणि पुणे शहरांमध्ये गुन्हे शाखेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर केंद्र सरकारच्या आदेशानुसार त्यांना दिल्ली आणि हैदराबाद या ठिकाणी सीबीआयच्या उप महानिरीक्षक तर हैदराबाद मध्येच त्यांनी सीआरपीएफचे अतिरिक्त महानिर्देशक म्हणूनही काम पाहिलं.

Prajakt Tanpure : निवडणूक निकालाच्या धसक्याने रोहित पवार टार्गेटवर; तनपुरेंची टीका

तर शुक्ला यांच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा विवाह आयपीएस ऑफिसर उदय शंकर यांच्याशी झाला होता. ते मुंबईमध्ये आरपीएफमध्ये वरिष्ठ पदावर होते. शंकर यांचं 2018 मध्ये निधन झालं. 1988 पासून आपल्या प्रशासकीय सेवेला सुरुवात करणाऱ्या शुक्ला या 2020 मध्ये मात्र सर्वात जास्त चर्चेत आल्या. याचं कारण होतं महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्याकडून करण्यात आलेल्या नेत्यांचं फोन टॅपिंग.

शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जात असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्लांना चांगलचं धारेवर धरलं. पण उच्च न्यायालयाने सप्टेंबर 2023 मध्ये शुक्लांवरील सगळे एफआयआर रद्द करत त्यांना निर्दोष ठरवलं. तसेच शुक्ला या सर्वात सीनियर आयपीएस अधिकारी असल्याने जून 2024 मध्ये ते निवृत्त होणार आहेत. मात्र असं बोललं जात आहे की, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर त्यांचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज