Download App

आपल्याला आणखी प्रगती करायचीये; सोडवलेल्या प्रश्नांचा वळसे पाटलांनी वाचला पाढा

आतापर्यंत आपण अनेक प्रश्न सोडविण्याचे काम केले असून, पाच वर्षांत केलेली कामे यापुढेही करायची आहेत.

  • Written By: Last Updated:

मंचर : भविष्यात आपल्याला अजुन प्रगती करायचा असून, यापूर्वी आपण पाण्याचे, आरोग्याचे, शिक्षणाचे, रस्त्यांचे प्रश्न सोडविले असल्याचा पाढा सहकार मंत्री आणि महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी वाचून दाखवला. ते शिंदेवाडी, चिंचोली आदी गावभेट दौऱ्यादरम्यान बोलत होते.

…म्हणून वळसे पाटलांनी पवारांची साथ सोडली; आढळरावांनी सांगितली ‘अंदर की बात’

वळसे पाटील म्हणाले की, या निवडणुकीत देशाचे व राज्याचे राजकारण बदलले आहे, हे तुम्हालाही माहीत आहे. राज्य पातळीवर काही असो, प्रश्न आपल्या गावाचा व आपल्या भागाचा आहे. पूर्वी ग्रामीण भागातील लोक नोकरी पाण्यासाठी मुंबईला जात होते. परंतू आता या भागाचं बदललेले स्वरूप पाहिलं तर मनाला एक आनंद होतो. हा बदल गेल्या 25 ते 30 वर्षांत घडला व त्याचं कारण म्हणजे आपल्याला धरणाचं मिळालेले पाणी हे होय. त्यामुळे शेतकऱ्याला शेती पिकातून, दुधातून, उसातून चांगले पैसे मिळाले व त्यातून आपली प्रगती झाली असे वळसे पाटील म्हणाले.

आंबेगावच्या विकासासाठी वळसे पाटलांचीच गरज : आढळराव पाटील

धरणाचे पाणी आले, ऊस झाला त्यासाठी आपण कारखाना काढला, शिंदेवाडी गाव हे नेहमीच काँगेस विचारांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मात्र, कुठलीही निवडणूक असो शिंदेवाडीने नेहमीच आम्हाला पाठिंबा दिला असून, तशीच मोलाची साथ तुम्ही या वेळीही मला द्याल याची मला खात्री असल्याचे वळसे पाटील म्हणाले.

आंबेगावात वळसे पाटलांचाच गाजावाजा; सर्व्हेतून संपूर्ण चित्र स्पष्ट

आतापर्यंत आपण अनेक प्रश्न सोडविण्याचे काम केले असून, पाच वर्षांतआतापर्यंत आपण अनेक प्रश्न सोडविण्याचे काम केले असून, पाच वर्षांत केलेली कामे यापुढेही करायची आहेत. केलेली कामे यापुढेही करायची आहेत असा शब्द त्यांनी दिला.जे व्हा शेतकरी अडचणीत असतो तेव्हा त्याला अडचणीत वाचवते ते फक्त शिक्षण. या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या मुलांनी शिकावं चांगला व्यवसाय करावा, चांगली नोकरी मिळावी यासाठी राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून चांगली योजना काढली आहे. त्यातून मिळणाऱ्या कर्जातून आपली मुले आपल्याच गावात चांगला व्यवसाय करू शकतो असे वळसे पाटील म्हणाले.

follow us