Download App

डोअर टू डोअर प्रचार अन् फ्री बसेस, भाजपच्या विजयासाठी RSS ने लावली संपूर्ण ताकद

Maharashtra Assembly Election : राज्यात विधानसभेसाठी उद्या (20 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. या निवडणुकीत महायुती (Mahayuti) की महाविकास

  • Written By: Last Updated:

Maharashtra Assembly Election : राज्यात विधानसभेसाठी उद्या (20 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. या निवडणुकीत महायुती (Mahayuti) की महाविकास आघाडी (MVA) कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे हरियाणाप्रमाणे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये (Maharashtra Assembly Election) पुन्हा एकदा भाजपला विजय करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) देखील जोरदार प्रयत्न सुरु आहे.

या विधानसभा निवडणुकीसाठी आरएसएस आणि त्याच्याशी संबंधित 37 संघटनांनी भाजपसाठी आपले कार्यकर्ते तैनात केले आहेत. माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीसाठी आरएसएसने जुलैपासूनच आपल्या रणनीतीवर काम करण्यास सुरुवात केली होती. आरएसएसचे संघाचे सह-सरचिटणीस अतुल लिमये यांच्याकडे भाजपच्या निवडणूक प्रचाराच्या समन्वयाची जबाबदारी दिली होती. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासोबत अनेक बैठका देखील घेतल्या. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला शाखा राष्ट्र सेविका समितीही भाजपसाठी घरोघरी जाणून प्रचार करत होती.

तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी आरएसएसने कुणबी, माळी, मराठा समाजासह इतर समाजाच्या नेत्यांशी संवाद साधला. तर भाजपकडे आकर्षित करण्यासाठी तरुण आणि शहरी मतदारांसाठी विशेष रणनीती आखण्यात आली होती. याच बरोबर आरएसएसकडून आयटी क्षेत्रात आणि इतर व्यवसायात काम करणाऱ्या तरुण मतदारांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात मतदान करण्यासाठी बसेस आणि मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. 100 टक्के मतदान व्हावे यासाठी आरएसएसने अनेक योजना आखल्या आहेत.

नागपूरसारख्या प्रमुख भागात डोअर टू डोअर प्रचार करण्यात आला. रामनगरसारख्या भागात आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी मतदारांशी दोनदा संपर्क साधला. तसेच यावेळी भाजपसाठी आरएसएसने तिकीट वाटपापासून ते बूथ व्यवस्थापनापर्यंत अनेक महत्वाचे कामे पार पाडली आहे.

बाजारात वाढणार गर्दी, लवकरच लाँच होणार ‘ह्या’ 5 सर्वात भारी इलेक्ट्रिक कार्स

तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पहिल्यांदाच निवडणुकीत सर्व ताकद लावली आहे, असा दावा ज्येष्ठ संघ कार्यकर्ते दिलीप देवधर यांनी केला. त्यामुळे आरएसएसच्या या प्रयत्नांचा भाजपला किती फायदा होणार हे तर 23 नोव्हेंबर रोजीच स्पष्ट होईल.

follow us