लोकसभेला अजितदादा गटाची मते भाजपला मिळाली नाही; RSS नंतर फडणवीसही नाराज!
Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) चांगलाच फटका बसला. भाजपला केवळ नऊ जागा जिंकता आल्या. त्यावरून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी (RSS) संबंधित असलेल्या ऑर्गनायझर आणि विवेक या साप्ताहिकांमधून अजित पवारांमुळेच (Ajit Pawar) लोकसभेला फटका बसल्याची टीका करण्यात आली होती. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाष्य केलं.
बुद्रुक कोण अन् खुर्द कोण?; मी पुरता गोंधळून गेलोय : संभाजीराजे छत्रपती
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मतं आम्हाला जास्त मिळाली. त्या तुलनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं आम्हाला कमी मिळाली, असं विधान फडणवीसांनी केलं.
इंडिया टुडे या वृत्तवाहिनीच्या कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी शिंदे गट आणि अजित पवार गटाशी युती करूनही त्यांची मतांच्या रुपात साथ मिळाली नाही का? अशी विचारणा फडणवीसांना केली असता ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मतं आम्हाला जास्त मिळाली. त्या तुलनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं आम्हाला कमी मिळाली. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. हे दोन्ही पक्ष एक प्रकारे फुटून निघालेले नवीन पक्ष होते. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक स्वत:चा मतदार तयार करण्याची होती. त्यातून मतं आमच्याकडे हस्तांतरित करणं अवघड काम होतं. आमच्यासाठी ते कठीण काम नव्हतं. आम्ही एक स्थिर पक्ष होतो. त्यामुळे आमची मतं आम्ही त्यांच्याकडे वळवू शकलो. विधानसभेत मात्र, हे होणार नाही. विधानसभेत तेनक्कीच मतं आमच्याकडे वळवू शकतील, असं फडणवीस म्हणाले.
Game Changer: राम चरणचं चाहत्यांना मोठं गिफ्ट! कियारा अडवाणीसोबत ‘गेम चेंजर’ मधील दुसरं गाणं भेटीला
ते म्हणाले, शिवसेनेसोबत आमची अनेक वर्षांपासून युती आहे. त्यामुळे आमची मतं एकमेकांना देणं सोपं आहे. पण, राष्ट्रवादीच्या विरोधात आम्ही अनेक वर्ष लढलो, त्यामुळं त्यांची मत वळवणं थोडं कठीण होतं. पण आता ते तितकेसे अवघड जाणार नाही. कारण आता ही महायुती स्थिर आहे, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांना सोबत घेतल्यानंतर झालेल्या नुकसानावर वेगळा विचार करून त्यात सुधारणा करण्याचा अर्थात कोर्स करेक्शनचा काही विचार आहे का? असे विचारले असता फडणवीस म्हणाले की, तसा कोणताही विचार नाही.
फडणवीस म्हणाले की, आता कोर्स करेक्नशची वेळ नाहीये. आणि तसे करणंही योग्य नाही. जो कोर्स चालू आहे, त्याच कोर्सला सामोरं जावं लागले. आम्ही तिन्ही पक्षांना एक वास्तववादी दृष्टिकोन ठेवावा लागेल. अशावेळी, आम्ही फक्त आकड्यावर जाऊन चालणार नाही. आमचा जिंकण्याच्या शक्यतांवर जास्त काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. जर आम्ही त्यात यशस्वी ठरलो तर तर कोर्स करेक्शनची गरजच नाही, असं फडणवीस म्हणाले.