Download App

डॉ. अतुलबाबा भोसलेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क, मतदारांनाही केलं कळकळीचं आवाहन

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी त्यांच्या पत्नी सौ. गौरवी भोसले यांच्यासमवेत मतदानाचा हक्क बजावला.

  • Written By: Last Updated:

Dr. Atulbaba Bhosale : राज्यात विधानसभेच्या (Vidhansabha Election) 288 जागांसाठी राज्यभरात शांततेत मतदान सुरू आहे. भाजपा – महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले (Dr. Atulbaba Bhosale) यांनी त्यांच्या पत्नी सौ. गौरवी भोसले यांच्यासमवेत रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील पवार मळा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तसेच य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, सौ. उत्तरा भोसले आणि विनायक भोसले यांनीही या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

शेवटच्या टप्प्यात ट्विस्ट! सोलापुरात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा अपक्षाला पाठिंबा; ठाकरेंच्या अडचणी वाढणार 

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, या निवडणुकीत जनतेला मला खूप मनापासून साथ दिली. खूप प्रेम दिले. या निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही सकारात्मक प्रचारावर भर देत, विकासकामांचे मुद्दे जनतेसमोर मांडले. भविष्यातील ५ वर्षांत या मतदारसंघाच्या विकासासाठी व लोकांच्या प्रगतीसाठी काय करता येईल, याबद्दलचे व्हिजन मी मतदारांसमोर मांडले.

VIDEO : परळीत मोठा राडा! मुडेंच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाच्या नेत्याला केली मारहाण 

लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण, थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते आणि सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले आप्पांचा वैचारिक वारसा घेऊन आम्ही लोकांसमोर गेलो. त्यामुळे मला खात्री आहे, की यावेळी मतदारराजा मला आपल्या सेवेची संधी देणार आहे. मी मतदारसंघातील सर्व बंधू – भगिनींना आवाहन करतो, की जास्तीत जास्त मतदान करा. मतदानाचा पवित्र हक्क बजावा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी योगदान द्या, असं आवाहन अतुलबाबा भोसलेंनी केलं.

follow us