विधानसभेच्या रणधुमाळीत सुप्रीम कोर्टाचा अजितदादांना 36 तासांचा अल्टिमेटम; वाचा नेमकं काय घडलं?

NCP Dispute In Supreme Court : राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा

  • Written By: Published:
NCP Dispute In Supreme Court

NCP Dispute In Supreme Court : राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अजित पवार (Ajit Pawar) गटाला घड्याळाच्या चिन्हाबाबत पुढील 36 तासांच्या आत मराठी वर्तमानपत्रात डिस्क्लेमर देण्याचे आदेश दिले आहे. या डिस्क्लेमरमध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. निकाल लागेपर्यंत घड्याळ चिन्ह आम्हाला दिलंय. असं लिहा असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालायने अजित पवार गटाला दिले आहे.

अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालायाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत नसल्याचा आरोप शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून करण्यात आला होता. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी झाली. डिस्क्लेमरबाबत सर्वोच्च न्यालयालयाने विचारणा केली असता आमच्याकडुन जाहिरातीच्या प्रत्येक ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असा डिस्क्लेमर दिला जात आहे असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आले.

यावर तुम्ही दररोज देणाऱ्या जाहिरातीमध्ये डिस्क्लेमर देत आहे का? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला करण्यात आली. यावर उत्तर देत दररोजच्या नाही मात्र कॉमन ठिकाणी डिस्क्लेमर देण्यात येत आहे. असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आले.

तर दुसरीकडे अजित पवार गटाने अनेक ठिकाणी डिस्क्लेमर दिला नसल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला. तसेच मागण्या 25 वर्षांपासून घड्याळ चिन्ह शरद पवार वापरत आहे आणि त्यामुळे घड्याळ म्हणजे शरद पवार हे समीकरण तयार झालं आहे. आमच्याकडे अनेक ठिकाणी अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याविषयीचे डिस्क्लेमर दिलं नाही त्याचे स्क्रीन शॉट आहेत. असं शरद पवार गटाकडून सांगण्यात आले.

तसेच नागालँड आमदार अपत्रता प्रकरणी सुनावणी देखील या प्रकरणाबरोबर करण्यात यावी अशी मागणी देखील शरद पवार गटाकडून करण्यात आली. मात्र या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 तारखेला होणार आहे.

स्वप्नील जोशी पुन्हा एकदा निर्मात्याच्या भूमिकेत, सुशीला – सुजीत चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

तर दुसरीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. या विधानसभा निवडणुकीत मुख्य लढत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये पाहायला मिळणार आहे.

follow us