Raj Thackeray on Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे प्रचार (Raj Thackeray) सभा घेत आहेत. आता राज ठाकरेंनी एका वृत्तवाहिनीला नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मोठे आश्चर्याचे धक्के महाराष्ट्रात बसतील असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले आहे. राज्यात सध्याची परिस्थिती अशी आहे की निवडणुकीत काय होईल याचा अंदाज कुणालाच बांधता येणार नाही. त्यात राज ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
माहीमचा तिढा, राज ठाकरेंसोबत संबंधांत दुरावा? शिंदे म्हणाले, राजकारणात..
महाराष्ट्रात निकालानंतरची परिस्थिती काय याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, या निवडणुकीत काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. मला वाटतं यावेळी राज्यात अनेक गोष्टींचे वेगवेगळे सरप्राईज मिळतील. त्यामुळे आणखी आठ ते दहा दिवस थांबा. मग तुम्हाला समजेल की काय सरप्राईज आहेत. सरप्राईज आहे म्हटल्यानंतर आधीच कसं सांगणार असं राज ठाकरे म्हणाले. त्यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीतील एका प्रचारसभेत राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचं (Devendra Fadnavis) कौतुक केलं होतं. यावेळी त्यांनी आपल्या या भूमिकेचा पुनरुच्चार केला. विषयांची समज, त्यांची सोडवणूक करणं, राज्याच्या प्रश्नांबाबतचं आकलन आजमितीस देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चांगलं आहे. तसेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एक दिलदार माणूस आहे. ते नेहमीच सढळ हातांनी मदत करतात. राजकारणात अशी माणसंही गरजेची असतात. त्यामुळे त्यांचं कॉम्बिनेशन योग्य पद्धतीनं चालतं.
तेव्हा मी उद्धव ठाकरेंच्या जागी असतो तर.. नाशिकमध्ये राज ठाकरे स्पष्टच बोलले