Download App

तोपर्यंत महाराष्ट्राला ‘चांगले’ दिवस येणार नाही, फोडाफोडी राजकारणावरून राज ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल

Raj Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (Mahayuti) जोरदार प्रचार

  • Written By: Last Updated:

Raj Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (Mahayuti) जोरदार प्रचार देखील करण्यात येत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीला टक्कर देण्यासाठी मनसे (MNS) देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बालेकिल्यात सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी आज ठाण्यात मनसे उमेदवार अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्या प्रचारात ठाण्यात जाहीर सभा घेतली.

या सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ज्या मतदारसंघात आमचे उमेदवार निश्चित निवडणून येणार तिथे मी जास्तीत जास्त सभा घेत आहे. पूर्वी ठाण्याला तलावांचा शहर म्हणत होते मात्र या लोकांनी संपूर्ण शहर बर्बाद करून टाकलं. असं राज ठाकरे म्हणाले.

तसेच या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टिका करत उद्धव ठाकरे व्यासपीठावर असताना पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि मंत्री अमित शाहांनी (Amit Shah) पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) होणार हे सांगितलं होतं, मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आक्षेप का नाही घेतला? असा प्रश्न विचारात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

तर राज ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील हल्लाबोल केला. या सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, जेव्हा एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार फोडले तेव्हा त्यांनी सांगितले होते अजितदादासोबत मांडीला मांडी लावून बसल्यावर मला श्वास घेता येत नव्हता असं एकनाथ शिंदे सांगत होते मात्र आता तेच शिंदे अजितदादासोबत मांडीला मांडी लावून बसलेले आहे. अशी टीका राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

मात्र तरीही देखील तुम्ही यांना मतदान करत आहे. तुम्हाला मतदार म्हणून लाज वाटली पाहिजे. कारण की या लोकांना माहिती आहे यांच्या समोर पैसे फेकले तर हे लोक आम्हालाच मतदान करणार आहे. मात्र जेव्हा पर्यंत तुम्ही हा समज मोडत नाही तोपर्यंत महाराष्ट्राला चांगले दिवस येणार नाही असेही राज ठाकरे म्हणाले. तसेच गेल्या पाच वर्षात माझा एकमेव आमदार राजू पाटील याला देखील सहज सौदा करता आला असता मात्र माझ्याकडचा आमदार विकणारा नाही तर टिकणारा आहे. असं देखील राज ठाकरे म्हणाले.

प्रा. वामन केंद्रे यांची निशुल्क “मॅजिक ॲाफ ॲक्टींग” ही कार्यशाळा 8,9 व 10 नोहेंबर रोजी

तर महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण शरद पवार यांनी सुरु केला असा आरोप देखील त्यांनी यावेळी बोलताना शरद पवार यांच्यावर केला. गेल्या पाच वर्षात राज्यात फक्त आमदार फुटले नाहीतर या लोकांनी पक्ष आणि चिन्ह देखील चोरले.  शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची प्रॉपर्टी नाहीतर बाळासाहेब ठाकरे यांची प्रॉपर्टी आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्ह शरद पवार यांची प्रॉपर्टी आहे. असेही यावेळी राज ठाकरे म्हणाले.

follow us