Download App

माझ्या हिंदू बांधवांनो पाठिशी ठामपणे उभे रहा; राज ठाकरेंनीही काढला फतवा

माझ्या हिंदु बांधवांनो पाठिशी ठामपणे उभं रहा, या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलायं.

Raj Thackeray News : माझ्या हिंदू बांधवांनो पाठिशी ठामपणे उभं रहा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. दरम्यान, मशिदीतील मौलवींकडून फतवा काढण्यात येत असल्याने राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मौलवींचा उल्लेख करीत मीही फतवा काढत असल्याचं घोषित केलंय. वरळी मतदारसंघातील मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी विविध मुद्द्यांवरुन त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

बारामतीत किती लीड मिळणार? अजितदादांचं विरोधकांना धडकी भरवणारं उत्तर, म्हणाले, ‘शंभर टक्के…’

राज ठाकरे म्हणाले, मशिदीतील मौलानांनी महाविकास आघाडीला मतदान देण्याचे फर्मान काढले आहेत. यासंदर्भातील व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहेत. मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला मतदान करण्याचे फर्मान काढण्यात येत आहेत. आज राज ठाकरे फर्मान काढतोयं, माझ्या तमाम हिंदु बांधवांनो माझ्या पाठिशी ठामपणे उभे रहा, सत्ता हातात आल्यास पहिल्या 48 तासांत मशिदीवरील भोंगे नाही उतरवले तर राजकारण सांगणार नाही, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केलीयं.

चित्रपटगृहात 15 नोव्हेंबरला मनोरंजनाची चटकदार ‘पाणीपुरी’; ‘गोल्डमॅन’च्या भूमिकेत ऋषिकेश जोशी, चाहत्यांची उत्सुकता वाढली

तसेच राज्याची संपूर्ण सत्ता माझ्या हातात दिली तर मी मुंबई साफ करण्याचे आदेश पोलिसांनी देईन कारण पोलिसांना सर्वकाही माहिती असतं, कारवाईला गेल्यावर पोलिसांवरच कारवाई होते, त्यांना निलंबित केलं जात त्यांच्यामागे कोणी उभं राहत नाही. रझा अकादमीच्या मोर्चावेळी हजारो मुसलमान आझाद मैदानावर आले होते, तिथं माध्यमांच्या गाड्या फोडल्या कॅमेरामनला मारलं, त्याविरोधात कोणी नाही उठलं फक्त मनसेने मोर्चा काढला. या नीच प्रवृत्ती अनेक मोहल्लायत लपल्या आहेत, एकदा हाती सत्ता द्या अशा लोकांना नाही सडकून काढले तर पाहा, असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.

‘पवार साहेबांवर खालच्या पातळीवर टीका केल्यास…’, अजितदादांचा सदाभाऊ खोतांना सज्जड दम

2019 नंतर सर्वच पक्षांनी अब्रू बाजूला ठेवल्या…
उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले ते कसे झाले ते माहिती आहे. विचारधारा नावाची गोष्टच नाही उरली. 2019 नंतर सर्वांनी आपापल्या अब्रू बाजूला ठेवल्या. एक दिवशी सकाळी समजलं की अजित पवार अन् फडणवीस शपथ घेताहेत. आधी विश्वासच बसला नाही, अर्धा तास लग्न टिकलं लगेच डिवोर्स, घटस्फोटानंतर लगेच उद्धव ठाकरेंनी पाहिलं आपल्याला कोण डोळा मारतंय. काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून लोकांनी भाजप-सेनेला मतदान केलं. भाजप-सेना नको म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान केलं. पहाटेचा शपथविधीला राष्ट्रवादी-भाजपचा नेता शपथ घेतो, मग त्यातून एक पक्ष उठतो आणि संसार करायला लागतो, अशी जहरी टीका राज ठाकरेंनी सर्वच पक्षाच्या नेत्यांवर केलीयं.

follow us