Download App

बाबीर बुवाच्या गुलालाची शप्पथ घेत तरूण उमेदवारने ठोकला भरणे अन् हर्षवर्धन पाटलांविरोधात शड्डू

बाबीर बुवाचा गुलालाची शपथ घेऊन सांगतो, काहीही झाले तरी आता माघार घेणार नाही, असं म्हणत प्रवीण मानेंनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला.

  • Written By: Last Updated:

 

Indapur Politics : प्रवीण माने (Praveen Mane) हे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या जागी आपल्याला उमेदवारी देण्याची मागणी मानेंनी शरद पवारांकडे (Sharad Pawar)केली होती. मात्र ती मागणी मान्य न झाल्याने ते आता अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत. बाबीर बुवाचा गुलालाची शपथ घेऊन सांगतो, काहीही झाले तरी आता माघार घेणार नाही, असं म्हणत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला.

विधानसभा निवडणुकीत मनसेला भाजप पाठिंबा देणार का? बाळा नांदगांवकर म्हणाले, हा त्यांचा प्रश्न… 

प्रवीण माने हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यापूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळई ते म्हणाले की, आजवर तुम्ही हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांना संधी दिली आहे. मला एकदा पाच वर्षे संधी देऊन बघा. तुमचा सेवक म्हणून मी काम करेल. शाहू-फुले आंबेडकरांच्या विचारांचा तालुका आपण निर्माण करू, असं ते म्हणाले.

ते म्हणाले, इंदापूर तालुक्याचा 1995 चा इतिहास पहा. इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे, जेव्हा तिरंगी लढत होते, तेव्हा जो उमेदवार अपक्ष उभा राहतो, तेव्हा तो इंदापूर तालुक्यातून निवडणूक येतो, असंही माने म्हणाले.

तिरंगी लढतीतही विजय ठाकरे गटाचाच; उमेदवारी मिळताच सावंतांनी ठणकावून सांगितलं 

आपल्या सर्वांच्या साक्षीने व आशीर्वादाने थोड्या वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहे. लक्षात ठेवा परिवर्तनाच्या लढ्यात समोर बसलेला प्रत्येक माणूस आमदार आहे. मी एकटा आमदार होणार नाही. आज सकाळी बाबीर बुवाला नारळ फोडून नतमस्तक झालो, बाबीर बुवाचा गुलाल घेऊन आलोय, या गुलालाची शपथ घेऊन सांगतो की, तुमच्या पाठिंब्यामुळे मी आज विधानसभेला अर्ज भरत आहेत. त्यामुळे काहीही झाले तरी मी दाखल केलेला अर्ज मागे घेणार नाही, असं म्हणत मानेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला.

माझे वडील नेहमी म्हणायचे की देवाच्या आशीर्वादाने आपं खूप चांगलं आहे. पण बेटा, तू माणसं कमावं. जेव्हा संकटं आली तेव्हा हीच जनता धावून आली. निवडणुका येतील आणि जातील, पण कोणाला दुखवू नका. दारात जाऊ, पाया पडू, जनतेने आशीर्वाद दिल्यास सेवक म्हणून काम करू. जनतेने निवडणुका स्वत:च्या हातात घेतल्यास काय होते ते लोकसभेला पाहिलं आहे, असं माने म्हणाले. माने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यानं इंदापूरमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे.

 

follow us