अमित ठाकरेंना भाजप पाठींबा देणार? बाळा नांदगावकरांनी एकाच वाक्यात विषय संपवला!

अमित ठाकरेंना भाजप पाठींबा देणार? बाळा नांदगावकरांनी एकाच वाक्यात विषय संपवला!

Bala Nandgaonkar On BJP Support In Assembly Election : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मनसेने (MNS) बिनशर्त पाठिंबा दिला होता. भाजपने (BJP) आम्हाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही द्यायचा, हा त्यांचा प्रश्न आहे. राज ठाकरे दिलदार व्यक्ती आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांनी दिलीय. शुक्रवारी मी 12.30 वाजता फॅार्म भरायला जाणार आहे. माझ्यासोबत राज ठाकरे, शर्मिला ठाकरे येणार आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे.

तिरंगी लढतीतही विजय ठाकरे गटाचाच; उमेदवारी मिळताच सावंतांनी ठणकावून सांगितलं

बाळा नांदगांवर म्हणाले की, माझा लोकांवरती कालही विश्वास होता, आजही आहे. मी इलेक्शन खेळतो लढत नाही. मागच्या वेळी निवडणूकीत पराभव झाल्यानंतर अजय चौधरींना फोन करणारा पहिला मी होतो. चांगल्या कामांना आम्ही नेहमी पाठिंबा देतो. एकनाथ शिंदे यांनी त्यांचे निवडून आलेले आमदार त्यात केवळ संदिपान भुमरे सोडून सगळ्यांना त्यांनी उमेदवारी दिलीय. मैत्रीपुर्ण लढतीची काही चर्चा नसल्याची प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी दिलीय.

मोठी बातमी! संभाजी ब्रिगेड अन् ठाकरे गटाची युती तुटली, ब्रिगेड जरांगेंना साथ देणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत गेलेल्या सर्वच आमदारांना यंदा विधानसभेचं तिकीट दिलंय. केवळ संदिपान भुमरे खासदार झाल्यामुळे त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात (Assembly Election) आलंय. या सगळ्या आमदारांना तिकीट दिल्यामुळे पाहुया काय होतंय ते, असं बाळा नांदगांवकर म्हणाले आहेत. यादीनुसार उमेदवारांना तिकीट दिलं असावं असं बाळा नांदगांवकर म्हणाले आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांना तिकीटद दिलंय. बाळा नांदगावकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील एक प्रमुख चेहरा आहेत. बाळा नांदगांवकर हे राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. मनसेची स्थापना झाल्यापासून ते राज ठाकरेंसोबत आहेत. 2014 मध्ये बाळा नांदगांवकर यांचा पराभव झाला होता. आतापर्यंत ते चारवेळेस आमदार म्हणून निवडून आले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube