मोठी बातमी! संभाजी ब्रिगेड अन् ठाकरे गटाची युती तुटली, ब्रिगेड जरांगेंना साथ देणार?
Sambhaji Brigade : महायुतीच्या (Mahayuti) तिन्ही घटक पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. अद्याप महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) जागावाटप पूर्ण झाले नाही. ठाकरे गट आणि कॉग्रेसमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. अशातच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) आणि ठाकरे गटाची युती तुटल्याची माहिती समोर आली.
‘पौर्णिमेचा फेरा’ हॉरर कॉमेडी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ युट्युब चॅनेलवर पाहता येणार
महाविकास आघाडीतील छोट्या पक्षांना जागावाटपात विचारात घेतलं जात नसल्यामुळं छोटे घटक पक्ष नाराज आहेत. आता संभाजी ब्रिगेडनेही नाराजी व्यक्त केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा दिला होता. यानंतर माविआच्या नेत्यांनी तुम्हाला विधानसभेच्या पाच ते सहा जागा देऊ, असे सांगितले. मात्र या जागेची चर्चा झाली नाही. आम्हाला जागावाटपात सहभागी केलं नाही. त्यामुळेच आम्ही ही युती तोडत असल्याचं आखरेंनी स्पष्ट केलं.
फॅशनच्या विश्वात नवी सुरुवात! सोनम कपूर ‘डिओर’ची ब्रॅंड एम्बेसडर
मविआचे पुरोगामीत्व नकली…
पुढं ते म्हणाले, महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर बहुजनवादी चळवळींना बळ मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा धुळीस मिळाली. हे पक्ष पुरोगामी चळवळीला थारा देत नाहीत, अशी टीका करत महायुतीची सनातनी विषमता आणि महाविकास आघाडीचे नकली पुरोगामीत्व यांच्या विरुध्द बहुजन समाजीतल सर्व पुरोगामी चळवळींना एकत्र येऊ लढलं पाहिजे, असं आवाहनही आखरेंनी केलं.
ठाकरेंनी आश्वासनं पाळली नाही…
उद्धव ठाकरेंनी दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. ५-६ जागा देण्यासंदर्भात चर्चा झाली होती. मात्र एकही जागा संभाजी ब्रिगेडला सोडली गेली नाही. मग या युतीत का राहायचे? असा सवाल आखरेंनी केला.
काही दिवसांपूर्वी जरांगे पाटलांकडे आमचं शिष्टमंडळ गेलं होत, आता परत जाईल. त्यानंतर पुढील भूमिका जाहीर करू, असं आखरेंनी सांगितलं. त्यामुळे आता जरांगे पाटील यांच्यासोबत संभाजी ब्रिगेड जाणार का? हेच पाहणं महत्वाचं आहे.