Download App

अपक्ष अर्ज भरला, लंकेंविरुद्ध जोरदार प्रचार केला आणि शेवटच्या क्षणी विजय औटींची घडाळ्याला साथ

Ajit Pawar Parner Meeting : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेर तालुक्यात

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar Parner Meeting : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेर तालुक्यात महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच नगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर देखील टीका केली. मात्र त्यापूर्वी त्यांनी खासदार निलेश लंके यांना मोठा धक्का देत अपक्ष उमेदवार व माजी नगराध्यक्ष विजय औटी (Vijay Auti) यांना पक्षात प्रवेश दिला आहे.

सर्वांना धक्का देत अपक्ष उमेदवार विजय औटी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघात खासदार निलेश लंके यांची पत्नी राणी लंके (Rani Lanke) महाविकास आघाडीकडून (MVA) निवडणुकीच्या रिंगणात आहे तर महायुतीकडून (Mahayuti) काशिनाथ दाते (Kashinath Date) यांना संधी देण्यात आली आहे. तर विजय औटी यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला होता.

विजय औटी यांनी संपूर्ण मतदारसंघात निलेश लंके यांच्या विरोधात प्रचार करत होते मात्र आज त्यांनी महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांना समर्थन दिल्याने पारनेर तालुक्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तालुक्यात विजय औटी विखे समर्थक मानले जातात. सरकार आल्यावर आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. असा आश्वासन अजित पवार यांनी पक्ष प्रवेशाच्यावेळी विजय औटी यांना दिला.

तर दुसरीकडे या जाहीर सभेत बोलताना अजित पवार काशिनाथ दाते यांची ओळख करून देण्याची आज गरज नाही असं अजित पवार म्हणाले. तसेच या निवडणुकीत असा प्रतिनिधी निवडणून द्या जे तुमचे काम करून देईल. असा आवाहन देखील त्यांनी यावेळी केला. तर कांदा नियात बंदीमुळे लोकसभा निवडणुकीत आम्हाला फटका बसला अशी कबुली देखील या सभेत बोलताना अजित पवार यांनी दिली. तसेच लोकसभेदरम्यान फेक नॅरेटिव्ह आणि संविधान बदलणार यामुळे महायुतीचा पराभव झाला असं देखील अजित पवार म्हणाले.

तर लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) विरोधक आमच्यावर टीका करत होते. राज्याची तिजोरी फोडली असा आरोप करत होते असेही अजित पवार म्हणाले. तसेच महिलांसाठी आमच्या सरकारने अनेक योजना लागू केल्या आहे. महिलांना आम्ही दरवर्षी 3 गॅस सिलेंडर देत आहे. मुलींना 100 टक्के शिक्षण फ्री देत आहोत तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिने दीड हजार रुपये देत आहे. असेही अजित पवार म्हणाले.

तसेच आम्ही सुजय विखे (Sujay Vikhe) यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती मात्र तुम्ही त्यांचा पराभव केला आणि दुसऱ्याला निवडणून दिले मात्र त्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला? केंद्रात सरकार दुसऱ्या विचाराचा आहे. त्यामुळे त्याला तिकडे काहीच काम करता येणार नाही असं अजित पवार म्हणाले.

‘आप’ला धक्का! परिवहन मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा; पक्षालाही सोडचिठ्ठी

तर या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे आणि सरकार आल्यावर तुम्हाला सध्या लागू असलेल्या योजना पुन्हा एकदा सुरु होणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.

follow us