Download App

निवडणूक मोठ्या मताधिक्याने कशी जिंकली? जितेंद्र आव्हाडांनी केला मोठा खुलासा

Jitendra Awhad On EVM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने 288 पैकी 236 जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad On EVM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने 288 पैकी 236 जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमताने बाजी मारल्याने विरोधकांनी EVM मशिन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे मुंब्रा कळवा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांचा जवळपास 1 लाख मताच्या फरकाने पराभव केला आहे. तर आता त्यांनी या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने बाजी कशी मारली याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी एक ट्विट करत याबाबत खुलासा केला आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? 1 ऑगस्ट 2024 रोजी ठाणे जिल्ह्यात EVM मशिन्सची FLC प्रक्रिया सुरू होणार असल्याची पहिली नोटीस आम्हाला निवडणूक आयोगाकडून आली. माझी एक टीम,ज्या मध्ये माझा कार्यकर्ता मोहसीन शेख आणि जिंदा सांडभोर हे त्यांच्या 25 सहकाऱ्यांच्या सोबत पहिल्या दिवसापासून या गोष्टीसाठी सज्ज होते.शिवाय त्यांच्या सोबतीला वकिलांची एक टीम देखील कामाला लागली होती. जशी ही नोटीस मिळाली,माझ्या या टीमने यात पूर्ण गांभीर्याने लक्ष घालत अगदी पहिल्या दिवसापासून या सगळ्या प्रक्रियेवर अगदी करडी नजर ठेवली.

EVM मशीन संदर्भात, FLC (First Level Checking) Randomisation I, Randomisation II, COMMISSIONING या प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून पार पाडल्या जातात. या प्रत्येक प्रक्रियेवर माझ्या टीमने लक्ष ठेवले. निवडणूक आयोगाकडून हलगर्जीपणा होत असल्यास तो त्यांच्या लक्षात आणून दिला, चुका होत असल्यास त्यात माझी मदत घेऊन त्या दूर केल्या, प्रसंगी संबंधित अधिकारी लोकांच्या सोबत वाद घातले,गोड बोलून काम करून घेतली..यामागे एक रणनीती होती. ती म्हणजे या लोकांना EVM संदर्भात सुरू असणाऱ्या प्रत्येक बाबींवर लक्ष आहे,याची जाणीव त्यांना करून देण्याची.

अगदी EVM च्या transport देखील आमचं लक्ष होत.दरवेळी EVM एखाद्या ठिकाणावरून दुसरीकडे हलविण्यात येणार असतील तर त्या सगळ्या गाड्यांच्या मागे या टीम मधील लोक आपल्या गाड्या घेऊन निघायचे.हे करताना ECI योग्य ते प्रोटोकॉल पाळत आहे की नाही,यावर देखील त्यांचं लक्ष असायचं.आणि काही गडबड असल्यास माझ्या लक्षात आणून द्यायचे. (एक गाडी without पोलीस प्रोटेक्शन, EVM घेऊन बाहेर निघाली होती,त्या संदर्भातील ट्विट तुमच्या लक्षात असेल.)

ECI च्या सगळ्या प्रक्रिया आम्ही पार पाडल्या असल्याने, आमच्याकडे कोणत्या बूथ वर कोणती मशीन जाणार आहे,याचे तपशील होते. ते आम्ही आमच्या पोलिंग एजंट ला दिले. परिणामी आमच्या बुथवर इतर कोणत्या मशिन्स आणण्याची हिम्मत इथ कोणी करू शकल नाही.

देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री, गृह, वित्तसह ‘या’ खात्यावर भाजप करणार दावा?

Counting ला जाताना देखील माझ्या या काउंटीग एजंट ना वरील सगळी माहिती आम्ही दिली होती.त्यांची प्रशिक्षण यावर झाली होती. थोडक्यात सांगायचं तर EVM संदर्भातील छोट्यातील छोट्या गोष्टींवर आम्ही लक्ष ठेवलं.परिणामी कोणतीही धांदली माझ्या मतदार संघात होऊ शकली नाही.आणि मी मोठ्या मताधिक्याने माझ्या मतदार संघातून निवडून आलो…!

follow us