देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री, गृह, अर्थसह ‘या’ खात्यावर भाजप करणार दावा?
Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) निकाल जाहीर झाले असून पुन्हा एकदा महायुती (Mahayuti) सरकार स्थापन करणार आहे. मात्र भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडून मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येत असल्याने मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेट नुसार राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री असणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
मीडिया रिपोर्टनुसार भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने फडणवीस यांच्या नावाला मंजुरी दिली आहे आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. तसेच शिंदे यांच्या शिवसेनेला 12 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा देखील सध्या जोराने सुरु आहे. तर भाजप स्वतःकडे मुख्यमंत्री पदासह 21 मंत्रीपदे ठेवणार आहे. भाजप गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही टॉपची चारपदे स्वतःकडे ठेवणार असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. तर भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप गृह आणि वित्त या खात्यावर जोर देऊ शकते.
आज संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्लीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक घेणार आहेत आणि या बैठकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तीन दिवस सावधान, ‘या’ भागात मुसळधार पाऊस अन् 75 किलोमीटर वेगाने वारे, अलर्ट जारी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने 288 पैकी 236 जागांवर विजय मिळावला आहे. यामध्ये भाजपला 131 तर शिंदे यांच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसला 41 जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागांवर विजय मिळाला. यामध्ये काँग्रेसला 16, ठाकरे यांच्या शिवसेनेला 20 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागांवर विजय मिळाला आहे तर 2 जागांवर समाजवादी पक्षाला यश आले आहे.