देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे CM? मुख्यमंत्रि‍पदाच्या नावावर आजच दिल्लीत होणार शिक्कामोर्तब

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे CM? मुख्यमंत्रि‍पदाच्या नावावर आजच दिल्लीत होणार शिक्कामोर्तब

BJP Devendra Fadnavis May Be Next CM Of Maharashtra : राज्यात 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) निकाल जाहीर झालेत. यावेळी महायुतीला बहुमत मिळालं आहे तर, सर्वात जास्ता जागा जिंकत भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. आता सर्वांचं लक्ष नवं मंत्रिमंडळ आणि राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याकडे लागलेलं आहे.राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज दिल्लीत दाखल होणार आहे.

महायुतीचे नेते आज दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासंदर्भात महत्वाची चर्चा करणार आहेत. यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रि‍पदासाठी फायनल झाल्याची माहिती सुत्रांनी दिलेली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने (BJP) राज्यात सर्वात जास्त जागा जिंकल्या आहे. फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अनेक आमदारांनी सीएम पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती दिलेली आहे.

मनसेची मान्यता रद्द होणार? अनंत कळसे यांनी स्पष्टच सांगितलं…

महायुतीचे वरिष्ठ नेते आज दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर मुख्यमंत्रि‍पदाचा शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. तर एक मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्री हेच सूत्र आताही कायम असणार आहे. नव्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये भाजपचे सर्वाधिक मंत्री असतील, तर अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाला एकसमान मंत्रीपद देण्यात येईल, असं देखील समोर येत आहे.

शिंदेंची कडवी झुंज अपयशी; मात्र, पवारांना घाम फोडला…

महायुतीचे नेते आज दिल्लीमध्ये आहेत. त्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी (Assembly Election 2024) सोहळा उद्याच पार पडणार, असल्याचं चित्र आहे. दरम्यान अजून कोणतीही अधिकृत माहिती महायुतीच्या नेत्यांनी दिलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळावं, यासाठी महायुतीचे अनेक कार्यकर्ते आग्रही आहेत. दरम्यान आज संध्याकाळपर्यंत फडणवीस यांचं नावं जाहीर होण्याची शक्यता आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube