Download App

50 वर्षे सत्तापद घेऊनही विद्यमान लोकप्रतिनिधींनी काहीच केलं नाही; डॉ. अतुलबाबा भोसलेंचा विरोधकांवर हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Atul Bhosale Sabha In Karve Assembly Election 2024 : कराडमध्ये राष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूक असलेला प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं कराड दक्षिण महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले आहेत. कराड दक्षिण विधानसभा (Assembly Election 2024) मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले (Atul Bhosale) यांच्या प्रचारार्थ कार्वे येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी जाहीर सभेला संबोधित केलंय.

डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले की, नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील याबाबत सुतोवाच केले आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर कराडमध्ये आणण्यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी मी येत्या काळात विशेष प्रयत्न करणार आहे. या प्रकल्पामुळे कराड दक्षिणमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले आहे. कार्वे येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील, य. मो. कृष्णा सहकार साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक निवासराव थोरात, आप्पासाहेब गायकवाड, प्रकाश वायदंडे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले की, कार्वे गावाच्या विकासासाठी माझे सातत्याने प्रयत्न राहिले आहेत. गेल्या अडीच वर्षात कार्वे गावात महायुती सरकारच्या माध्यमातून 28 कोटी 76 लाखांचा विकासनिधी आला असून, यातील बहुतांश कामे मार्गी लागली आहेत. कार्वे गावातील श्री धानाई देवस्थानचा विकास आराखडा तयार करुन, याठिकाणी भव्य भक्त निवास साकारण्याचा, तसेच येथील अध्यात्मिक पर्यटन वाढीला चालना देण्याचा प्रयत्न येत्या काळात मी करणार आहे.

शरद पवारांनी भरसभेत केलं भावनिक आवाहन ; महाराष्ट्राचं राजकारण बदलायचं असेल, तर महाविकास आघाडीला…

राज्यात विविध भागांमध्ये मोठ्या फाईव्ह स्टार एम.आय.डी.सी. असताना, कराडमध्ये मात्र एम.आय.डी.सी. विकासित होऊ शकली नाही. याठिकाणी एकही मोठा उद्योग नाही, ना इथल्या मुलांच्या हाताला काम नाही. 50 वर्षे सत्तापद घेऊनही विद्यमान लोकप्रतिनिधींनी उमेदीच्या दिवसात काही केले नाही, ते येत्या काळात काय करणार? असा सवाल करत डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड दक्षिणच्या शाश्वत विकासासाठी मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावं, असं आवाहन केलंय.

संभाजीराव पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वात विकासाची गंगा वाहती; प्रचार सभेत बाळासाहेब शिंगाडेंच मत

जगदीश जगताप म्हणाले की, गेली कित्येक वर्षे इथली जनता विद्यमान लोकप्रतिनिधींना संधी देत आली आहे. पण इथं निवडून यायचं आणि दिल्लीला जायचं, असा त्यांचा कारभार सुरु आहे. त्यामुळे त्यांना आता संधी न देता; विकासासाठी सदैव तत्पर असलेल्या अतुलबाबांना यावेळी जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं. प्रत्येकाने आपापसातील हेवेदावे बाजूला ठेऊन अतुलबाबांना विजयी करावं. यावेळी मदनराव मोहिते, आनंदराव पाटील यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाला मानसिंग पाटील, आप्पासाहेब गायकवाड, सर्जेराव कुंभार, संपतराव थोरात, दिग्वीजय थोरात, शिवाजीराव थोरात, प्रकाश वायदंडे, दिग्वीजय थोरात, कैलास जाधव, अशोकराव थोरात यांच्यासह कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

follow us