चिंचवडच्या शाश्वत विकासाचे ‘अभिवचन’! राहुल कलाटे यांचा जाहीरनामा प्रसिद्ध, सुप्रिया सुळेंच्या हस्ते प्रकाशन

चिंचवडच्या शाश्वत विकासाचे ‘अभिवचन’! राहुल कलाटे यांचा जाहीरनामा प्रसिद्ध, सुप्रिया सुळेंच्या हस्ते प्रकाशन

Rahul Kalate Released Manifesto For Assembly Elections 2024 : महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी आज विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections 2024) जाहीरनामा जाहीर केलाय. “चिंचवडच्या शाश्वत विकासाचे अभिवचन” संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी 11 नोव्हेंबर रोजी प्रकाशित केलंय. यावेळी बोलतांना सुळे यांनी परिवर्तनासाठी- तुमच्या सेवा – स्वाभिमान आणि समाधानासाठी राहुल यांना ‘तुतारी वाजविणारा माणूस’ या चिन्हावर मत देऊन विजयी करा, असं आवाहन केलंय. यावेळी सुमन पाटील, तुषार कामठे, राज राजापूरकर, स्वाती चिटणीस, मंजिरी धाडगे, सुनिल गव्हाणे, इम्रान शेख, नवनाथ जगताप, सागर तापकीर, ज्योती निंबाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

महिलांना दरमहा 3000 रुपये देणारी ‘महालक्ष्मी योजना’, कृषी समृद्धी, बेरोजगार तरुणांना दरमहा ४ हजार भत्ता, कुटुंब रक्षणार्थ 25 लाखांचा आरोग्य विमा कवच, सामानतेची हमी या लोकसेवेच्या पंचसूत्रीला महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यात (Rahul Kalate Released Manifesto) विशेष स्थान देण्यात आलंय. त्याच धर्तीवर चिंचवडच्या गरजा लक्षात घेऊन राहुल यांचे ‘अभिवचन’ साकारलंय.

चिंचवडमध्ये गेली अनेक वर्ष त्याच त्याच समस्या भेडसावत आहेत. सर्व समस्यांमधून ‘स्वातंत्र्य’ मिळवून जनतेच्या मदतीने ‘चिंचवडचा शाश्वत विकास’ साधण्यासाठीचे हे अभिवचन आहे. “भय आणि भ्रष्टाचारापासून सुटका, 24 तास मुबलक पाणी, वाहतूक कोंडीपासून सुटका आणि उत्तम रस्ते, वीज, आरोग्य व वैद्यकीय सुविधा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कला – क्रीडा – शिक्षण” अशा प्रमुख पण मूलभूत मुद्द्यांचा समावेश या अभिवचन नाम्यात करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व पातळ्यांवर हा जाहिरनामा चिंचवडकरांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.

माझ्याकडे अनुभवाची शिदोरी, कोणाच्या डोक्यात काही हवा असेल तर…., राणी लंकेंनी विरोधकांना फटकारलं

‘अभिवचना’तील प्रमुख मुद्दे:

वाहतूक कोंडीपासून मुक्ती: हिंजवडी आयटी पार्क मधील सुमारे तीन लाख कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका होण्यासाठी नाशिक फाटा ते पिंपळे सौदागर, वाकड – हिंजवडी, भक्ती शक्ती चौक ते मुकाई चौक ते वाकड असा मेट्रो आराखडा. चिंचवड वाल्हेकरवाडी स्पाईन रस्ता थेरगाव हिंजवडी रस्त्याला जोडणे. पुणे मुंबई लोहमार्गाला तिसरा ट्रॅक तसेच चिंचवड आकुर्डी जंक्शन निर्माण करणे. वाकड ते किवळे सेवा रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती.

विकासाचा समतोल: निधी वाटपातील अन्याय दूर करून समतोल विकास साधत आरक्षणाचा विकास, मेट्रो, रस्ते, वीज-पाणी, आरोग्य आणि शिक्षण अशा मूलभूत सुविधांचे सक्षमीकरण.

पाणीटंचाईतून मुक्तता: २४x ७ मुबलक पाणी पुरवठा; टँकर मुक्त चिंचवड; गेली चौदा वर्ष रखडलेला पवना बंद जलवाहीनी प्रकल्प राबवून मुळशी धरणातून चिंचवडपर्यंत जलवाहिनी. हिंजवडी, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, काळेवाडी, रहाटणी, थेरगावसह संपूर्ण चिंचवड भागाला २४ तास पाण्याची हमी.

प्रदूषण मुक्त पवना-मुळा: शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या पावना व मुळा नद्यांचे महा गटार झाले आहे. केंद्र व राज्य सरकारकडून राबवला जाणारा नदी सुधार प्रकल्प प्रत्यक्षात दिसत नाही. त्यामुळे या नद्यांच्या प्रदूषण मुक्तीचा संकल्प.

मुलीनंतर थेट नातवालाच समोर केलं; मी पुतण्या असलो तरी मुलासारखाच, काय म्हणाले अजित पवार?

अनधिकृत बांधकामांपासून मुक्ती: प्राधिकरण क्षेत्रातील बांधकामे पिं चिं मनपाकडे हस्तांतरित मात्र मालकी अजूनही घर मालकाकडे नाही. ती घर मालकांच्या नावावर करून देण्याला प्राधान्य. वाल्हेकरवाडी, चिंचवड, रावेत, काळेवाडी, रहाटणी, वाकड भागातील अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावर पंधरा वर्ष निवडणूक लढवल्या गेल्या. मात्र हा प्रश्न अद्यापही प्रलंबित. प्राधिकरणातील मूळ शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा द्यायचा आहे. तसेच प्राधिकरणाचे हजारो एकर मोकळे क्षेत्र पीएमआरडीए च्या घशात घातले, हा या शहरातील नागरिकांवर सर्वात मोठा अन्याय आहे. भूमिपुत्रांनी कवडीमोल दराने दिलेल्या या जागा शहराच्याच विकासासाठी वापरल्या गेल्या पाहिजेत, तसे धोरण राबवायचे आहे.

सक्षम वैद्यकीय सेवा: वाकड, सांगवी, जुनी सांगवी, रहाटणी, काळेवाडीसह चिंचवड विधानसभेतील नागरिक वैद्यकीय सेवेसाठी औंध उरो रुग्णालयावर विसंबून आहेत. दोन वर्षात औंध रुग्णालयात प्रत्येक आजारांवर उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करणार.

कला – क्रीडा – शिक्षण: वाकड महापालिका सीबीएसई शाळेच्या धर्तीवर पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, रावेत – पुनावळे येथे चिंचवड विधानसभेत ठिकठिकाणची शैक्षणिक आरक्षणे विकसित करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण संकुल उभारण्याची योजना, विकास आराखड्यातील सर्व आरक्षणे क्रीडा खात्याच्या मदतीने विकसित करणार.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube