Rahul Kalate : राहुल कलाटेंसाठी खासदार कोल्हेंची बाईक रॅली

  • Written By: Published:
Rahul Kalate : राहुल कलाटेंसाठी खासदार कोल्हेंची बाईक रॅली

Rahul Kalate : महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्या प्रचारार्थ संसदरत्न खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी रविवारी (ता. 10) चिंचवड मतदार संघात बाईक रॅली काढली होती.

यावेळी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, काळेवाडी, रहाटणी परिसरातील युवकांनी रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. चिंचवड विधानसभेला यंदा नवीन चेहरा निवडून देऊन बदल घडवणार अशी भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली. आजच्या रॅली दरम्यान यंदा वारं फिरलंय, रामकृष्ण हरी, वाजवा तुतारीच्या जयघोषाने सांगवी, रहाटणी परिसर दणाणून गेलेला.

यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप, मराठवाडा विकास संघांचे अध्यक्ष अरुण पवार, उद्योजक वसंत काटे, शिवाजी पाडुळे, गणेश काटे, संदेश नवले, अनिता तुतारे, सागर परदेशी, जालिंदर साठे, अरुण काटे, निखिल चव्हाण, पंकज कांबळे, मंगला भोकरे, पिंटू निंबाळकर, बाळासाहेब सोनवने, विजय साने, मोहन बारटक्के, यशवंत कांबळे, मिलिंद फडतरे, विरेंद्र गायकवाड, सौरभ शिंदे, यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थितीत होते. नागरिकांनी रस्त्याच्या दूतर्फा गर्दी करत ‘रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’ या घोषणेस हात उंचावून प्रतिसाद मिळाल्याने रॅलीत उत्साह संचारला होता. रहाटणीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली.

माध्यमांशी बोलताना नवनाथ जगताप, माजी अध्यक्ष स्थायी समिती यांनी सांगितले की, सांगवीकर घराणेशाहीला आणि आश्वासनाला कंटाळले आहेत, त्यामुळे यंदा परिवर्तन घडविण्याचा त्यांचा निश्चय आहे. सांगवीत यंदा तुतारीच वाजणार याबद्दल विश्वास आहे. असं ते म्हणाले.

Kishtwar Encounter : मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा चकमक, 3 जवान जखमी तर एक शहीद

तर ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. मी ठिकठिकाणी लोकांना भेटतो आहे. बदल हवा अशी लोकांची भावना आहे. त्यामुळे मला विजयाचा विश्वास आहे. असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटेमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube