तू कशाला फॉर्म भरतोस; राहुल कलाटेंनी वंचितच्या उमेदवाराला धमकाविले
Chinchwad Assembly Constituency: वंचित बहुजन आघाडी/strong>च्या उमेदवाराला धमकाविल्याप्रकरणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे ( Chinchwad Assembly Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाजवळ घडली आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात कलाटे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
Assembly Election: भाजपचं मोठा भाऊ; 148 जागा मिळविल्या; मुख्यमंत्री शिंदे जड गेले पण
मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवट दिवस होता. आज दुपारी जावेद शेख हे वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. तेव्हा महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल कलाटे यांनी जावेद शेख यांना तू कशाला फॉर्म भरतो आहेस?, तू फॉर्म भरलास तर मी तुला पाहून घेईल तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन निवडणूक संदर्भातील कागदपत्रे गॅलरीमध्ये फेकून दिल्याची तक्रार काळेवाडी पोलीस ठाण्यात शेख यांनी दिलीय. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान राहुल कलाटे यांनी या गुन्ह्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आमचे शक्तिप्रदर्शन पाहून जाणीवपूर्वक माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. मी कुणालाही काही बोललेलो नाही. हा माझ्याविरोधात कट आहे.