Download App

हमीभावाने सोयाबीन खरोदी सुरू करावी; शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार आशुतोष काळे धावले !

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची तातडीने हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु करावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

  • Written By: Last Updated:

कोपरगाव: खरीप हंगामात कोपरगाव मतदारसंघात (Kopargaon Assembly Constituency) सोयाबीनचे उत्पन्न मुबलक झालेले आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य दर मिळावा यासाठी शासनाकडून हमी भाव जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची तातडीने हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु करावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे केली आहे.

शरद पवारांवर केलेल्या टीकेचा आ. आशुतोष काळेंकडून निषेध, म्हणाले, ‘ वाचाळवीरांनी भान राखून…’

हातात नकदी पैसा देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिलं जातं. अनेक शेतकरी बांधवांचे मुख्य पीक हे सोयाबीन पिक आहे. सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होतो. त्यामुळे कोपरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीन पिक घेत असतात. शेतकऱ्यांना ज्यावेळी आर्थिक अडचण असेल त्यावेळी शेतकरी सहजपणे सोयाबीन बाजारपेठेत विक्रीसाठी आणून आपल्या आर्थिक अडचणी सोडवू शकतो. त्यामुळे सोयाबीनच्या अर्थकारणावर लाखो शेतकऱ्यांची उपजीविका चालत असते. या गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला दर मिळावा, यासाठी सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. 2024-25 मध्ये सोयाबीनच्या हमीभावात वाढ करुन तो हमीभाव 4 हजार 892 एवढा करण्यात आला आहे.

शरद पवारांवर केलेल्या टीकेचा आ. आशुतोष काळेंकडून निषेध, म्हणाले, ‘ वाचाळवीरांनी भान राखून…’

सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदीसाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अधिकृत नोंदणी देखील केलेली आहे. परंतु अद्यापपर्यंत हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु करण्यात आलेली नाही. नुकताच दिवाळी सण पार पडला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या काहीशा आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. तसेच सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून शेतकऱ्यांना रब्बीची पिके उभी करण्यासाठी आर्थिक भांडवलाची आवश्यकता आहे. परंतु सोयाबीन खरेदी सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक अडचण दूर करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची तातडीने हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु करण्याची मागणी केली आहे. तसेच हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदीसाठी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर खरेदीसाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतु हे पोर्टल बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी अधिकृत पोर्टल नियमितपणे सुरु राहील यासाठी काळजी घ्यावी असे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

follow us