मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोपरगाव मतदारसंघातील 50 किलोमीटर रस्त्यांना मंजुरी
अहमदनगर: कोपरगाव मतदारसंघातील (Kopargaon Assembly Constituency) ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्यांचा विकास झालेला आहे. नागरिकांच्या मागणीनुसार ज्या रस्त्यांचा विकास होणे अपेक्षित होते. त्या रस्त्यांना देखील निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्यातून 50 किलोमीटर अंतराच्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी दिली आहे.
कोपरगाव मतदारसंघातील एक कोटींच्या विकासकामांना मंजुरी : आ. आशुतोष काळे
यामध्ये राज्य महामार्ग ते कारवाडी रस्ता 3.47 किलोमीटर, संवत्सर, कासली शिरसगाव रस्ता 10.50 किलोमीटर, जळगाव शेळके वस्ती वाकडी ते धनगरवाडी ते दिघी तालुका हद्द रस्ता 8. 14 किलोमीटर, नपावाडी ते पुणतांबा रस्ता (1.91 किलोमीटर, शिंगवे ते नथू पाटलाची वाडी रस्ता 6.46 किलोमीटर, वारी ते जिल्हा हद्द रस्ता खोपडी 3.75 किलोमीटर, टाकळी ते ब्राह्मणगाव रस्ता 3.92 किलोमीटर, उक्कडगाव ते तळेगाव मळे रस्ता 7. 50 किलोमीटर, तळेगाव मळे ते खोपडी रस्ता 5.25 किलोमीटर 50 किलोमीटरच्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
कोपरगाव मतदारसंघातील सर्व मुख्य रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. यातील रस्त्यांचा विकास करण्यात यश मिळविले आहे. ज्या-ज्या रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्या रस्त्यांना विविध योजनेतून निधी कसा मिळविता येईल. यासाठी पाठपुरावा करीत होतो. या रस्त्यांचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या रस्त्यांच्या निधीची तरतूद होऊन या रस्त्यांचे नूतनीकरण होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा खराब रस्त्यांचा त्रास कायमचा दूर होणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.