Download App

निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय…

  • Written By: Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024 Devendra Fadnavis Reaction : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत (Assembly Election 2024) भाजपची (BJP) आश्चर्यकारक कामगिरी समोर आली आहे. 288 जागांपैकी 220 जागांवर महायुती असल्याचं चित्र आहे. म्हणजेच राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली मसरकार स्थापन होणार आहे. राज्यात भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

Jalna Election Results : जालन्यात अर्जुन खोतकरांची हवा, काँग्रेसच्या उमेदवाराला चारली धूळ

देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत की, आजच्या निकालाने स्पष्ट केलंय की, संपूर्ण महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र यांच्या पाठीशी आहेत. राज्यातील सगळ्या समाजाच्या लोकांनी एकत्र येवून मतदान केलंय. लाडक्या बहीणींचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी मानले आहेत. महाविकास आघाडीने मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. महायुतीच्या लाखो कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, रामदास आठवले आणि आमच्या एकजुटीचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

नेवाशात शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे विजयी, ठाकरे गटाचे माजी मंत्री शंकरराव गडाख पराभूत

महाराष्ट्राच्या जनतेसमोर नतमस्तक आहोत, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिलेली आहे. आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत . चक्रव्यूह तोडला आहे. महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. विरोधी पक्षाचा आम्ही सन्मान करणार आहोत. ईव्हीएमबाबत शंका उपस्थिती करण्यापेक्षा आत्मचिंतन करणे गरजेचे असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

लोकशाहीमध्ये कोणाला जनता डोक्यावर घेईन, कोणाला धाराशाही करेल ते सांगता येणार नाही. मुख्यंमत्रिपदाबाबत हे कोणत्याही निकषावर नाही. त्याबाबत तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहेत. कोणताही वाद नाही, कोणताच विवाद नाही. जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य असेल, देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. एका प्रकारे लोकांनी निर्णय दिला आहे, एकनाथ शिंदे यांना खऱ्या शिवसेनेच्या रूपात आणि अजित पवार यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रूपात स्विकारलं असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

 

follow us