Jalna Election Results : जालन्यात अर्जुन खोतकरांची हवा, काँग्रेसच्या उमेदवाराला चारली धूळ
Maharashtra Assembly Election Results 2024 : मराठवाड्यात 288 जागांपैकी 46 जागा असणाऱ्या मराठवाड्यात कुठला पक्ष निवडून येतो किंवा कुठल्या उमेदवाराची सरशी होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. दरम्यान मराठा आरक्षणाचे केंद्र राहिलेल्या जालना जिल्ह्यात कोण बाजी मारतय हे आता समोर आलं आहे. अर्जुन खोतकर राजेश टोपे यांच्यासारखे बडे नेते जालन्यातून निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवसेनेचे अर्जुन खोतकर जालन्यात 20, 000 + मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या कैलास गोरतयाल यांचा पराभव झाला आहे .
शिवसेनेच्या पहिल्या उमेदवारी यादीत अपेक्षेप्रमाणे विधानसभेच्या जालना मतदारसंघातून अर्जून खोतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी मिळाली तर जालन्यात खोतकर विरुद्ध गोरंट्याल हे पाचव्यांदा एकमेकांच्या विरोधात लढतील. तर खोतकर हे आठव्यांदा विधानसभेच्या आखाड्यात उतरत आहेत.2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंटीलाल यांना २९६ च्या फरकाने पराभूत केले होते . सलग दुसऱ्या वेळेस अर्जुन खोतकर विजयी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा केला जात आहे . 2024 मध्ये लोकसभेच्या जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे.कैलास गोरंट्याल आणि रावसाहेब दानवे यांची मैत्री, लोकसेभेत महायुती असून खोतकरांनी विरोधात केलेले काम याचा परिणाम विधानसभेला दिसू शकतो असे बोलले जात होते.
घनसावंगी विधानसभा मतदारसंघ
या जागेवर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे राजेश टोपे तर महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उढाण हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपचे सतीश घाडगे यांनी बंडखोरी केली असून ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार शिवाजीराव चोथे हे देखील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान घनसावंगी लढत आता चौरंगी होणार आहे. दरम्यान, घनसावंगीत शिंदे गटाच्या हिकमत उढाण यांना आघाडी मिळत असल्याचे चित्र आहे.
भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघ
या जागेसाठी महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार संतोष दानवे तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या जागेवर संतोष दानवे विरुद्ध चंद्रकांत दानवे यांच्यात लढत होणार आहे. या मतदारसंघात संतोष दानवेंना आघाडी मिळताना दिसत आहे.