Video : गोरंट्याल यांनी कवितेतून फडणवीस अन् शिंदेना घातली शपथ, ‘त्या’ प्रकरणावर केला प्रश्न

Kailash Gorantya on Arjun Khotkar : जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार आणि अर्जुन खोतकर (Khotkar) यांचे कट्टर विरोधक असलेल्या कैलास गोरंटयाल यांनी धुळ्यातील अंदाज समितीच्या दौऱ्यावेळी सापडलेल्या घबाडावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने नेमलेल्या SIT चौकशी समितीचं काय झालं? असा थेट प्रश्न उपस्थित करत समितीत कोण अधिकारी नेमले असंही ते म्हणाले आहेत.
सरकार धुळ्यातील घबाड प्रकरणात मुख्य आरोपीला पाठीशी घालत असून या चौकशी समितीत प्रवीण गेडाम यांना नियुक्त करा अशी मागणी गोरंट्याल यांनी यांनी केली आहे. त्या घबाडाबरोबरच वेगवेगळ्या योजनांच्या 3 हजार फाईल आढळून आल्याचा आरोप देखील गोरंटयाल यांनी केला आहे. धुळ्यातील सापडलेल्या घबाडाच्या चौकशीसाठी कोर्टात जाणार असल्याचा ईशाराही गोरंटयाल यांनी राज्य सरकारला दिला.
रुम नंबर 102, दोन कोटी अन् गोटेंनी डाव उधळवला; खोतकरांचा माणूस अडकला
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शपथ रेशीम बागेची, एकनाथ शिंदेंना शपथ दिघेंची, धुळ्यात सापडलेली काळ्या समितीची खोकी कुणाची?अशी प्रश्नांत्मक कविता करत गोरंटयाल यांनी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांचं नाव न घेता टिका केली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी धुळे येथील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रकमेचे प्रकरण विरोधी पक्षाने आक्रमकपणे उचललेले नाही. शिवाय होणारा तपासही योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे या प्रकरणात किशोर पाटील यांची नार्को टेस्ट करावी. या तपासणीनंतर आजवर ५०० कोटी रुपये वसूल केल्याचा प्रकार समोर येईल दावा त्यांनी केला होता.
गोरंट्याल-खोतकर जुना वाद
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. शासकीय मेडिकल कॉलेज, पाणीपुरवठा योजनेच्या श्रेयवादासह जालना विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवरून त्या दोन्ही नेत्यांमध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोप होताना दिसतात. धुळ्याच्या प्रकरणात गोरंट्या म्हणाले होते, राज्य सरकारने गठित केलेल्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर आणि या समितीतील अन्य आमदार सदस्य धुळे दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहात किशोर पाटील यांच्या नावाने बुक असलेल्या एका खोलीत १ कोटी ८० लक्ष रुपयांची रक्कम धुळे पोलिसांनी जप्त केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शपथ रेशीम बागेची, एकनाथ शिंदेंना शपथ दिघेंची, धुळ्यात सापडलेली काळ्या समितीची खोकी कुणाची?#कैलासगोरंट्याल @Dev_Fadnavis @mieknathshinde pic.twitter.com/iZnRtkSESM
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 27, 2025