रुम नंबर 102, दोन कोटी अन् गोटेंनी डाव उधळवला; खोतकरांचा माणूस अडकला

  • Written By: Published:
रुम नंबर 102, दोन कोटी अन् गोटेंनी डाव उधळवला; खोतकरांचा माणूस अडकला

Anil Gote VS Arjun Khotkar बुधवार. ठिकाण धुळे सरकारी (Dhule) गेस्ट हाऊस. रुमनंबर 102. अचानक धुळ्याचे ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांची एन्ट्री होते. रुमनंबर 102 समोर ठाण मांडून बसतात. वरिष्ठ अधिकारी येतात. रुम उघडून झडती घेतल्यानंतर तब्बल दोन कोटी रुपये सापडतात. धुळ्यात रात्री ही नाट्यमय घटना घडते. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. परंतु हे एेवढे पैसे कुणी जमा केले होते. पैसा कुणासाठी आणले होते. हे सर्व आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया…

विधिमंडळ अंदाज समिती तीन दिवसीय धुळे दौऱ्यावर आहे. जालन्याचे शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीत 29 आमदारांचा समावेश आहे. ही समिती धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेणार होती. बुधवारी रात्रीच काही आमदार या विश्रागृहावर मुक्कामी आले होते. त्याचवेळी माजी आमदार अनिल गोटे हे गेस्ट हाऊसमध्ये एन्ट्री करतात. अनिल गोटे हे विश्रामगृहात एखाद्या आमदाराला भेटायला आलेत, असे सर्वांना वाटले. परंतु गोटे हे एका रुमकडे जातात. ही रुम असते 102 नंबरची. या रुममध्ये राहणाऱ्या व्यक्ती अधीच कुलूप लावून निघून पसार झालेले असते. गोटे कार्यकर्त्यांसमवेत विश्रामगृहावर आंदोलन सुरू करतात. तब्बल पाच तास हे ठिय्या आंदोलन सुरू राहते. जिल्हाधिकारी आणि एसपींच्या उपस्थितीत ही रुम उघडण्याची मागणी करतात. या रुममध्ये पाच कोटी रुपये असल्याचा संशय ते व्यक्त करतात. बराच गदारोळ झाल्यानंतर काही वरिष्ठ अधिकारी गेस्ट हाऊसला येतात. कुलूप तोडून रुमध्ये उघडले जाते. रुममध्ये काही बॅगमध्ये मोठे खबाड म्हणजेच रोकड आढळून येते. त्यानंतर अधिकारी हे जवळपास तीन मशीनद्वारे हे पैसे मोजतात. रात्रभर पैशाचे मोजणी सुरू होती. तब्बल 1 कोटी 84 लाख रुपये आढळून आले. महसूल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे, पोलिस अधिकारी यांनी पंचनामा करून ही रक्कम जप्त केलीय.

बरं प्रशासनने रक्कम जप्त केल्यानंतर विषय संपत नाही. अनिल गोटे हे अंदाज समितीचे प्रमुख अर्जुन खोतकरांवर गंभीर आरोप करतात. अंदाज समितीचे प्रमुख व समितीतील आमदारांना देण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी ही रक्कम जमा केल्याचा आरोपही गोटे यांनी केलाय. परंतु अर्जुन खोतकरांना हे आरोप फेटाळून लावले आहेत. परंतु या रुममध्ये कुणी पैसे ठेवले होते. याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे.

पती घरी नसताना मारहाण अन्…, हगवणे कुटुंबाबाबत मोठ्या सूनेचा धक्कादायक खुलासा


किशोर पाटील कोण आहे ?

किशोर पाटील या व्यक्तीच्या नावावर ही रुम आहे. ते 20 वर्षांपासून शासकीय कर्मचारी आहेत. विधानभवनात ते कक्ष अधिकारी आहेत. प्रतिनियुक्तीवर अर्जुन खोतकर यांच्याकडे स्वीय सहाय्यक आहेत. पाटील हे 2016 ते 2019 अर्जुन खोतकर राज्य मंत्री असतांना स्वीय सहाय्यक होता. 17 ते 18 वर्षांपासून ते खोतकर यांच्यासोबत आहे. यापूर्वीही खोतकर अंदाज समिती अध्यक्ष असताना किशोर पाटील त्यांचे पीए म्हणून काम कर होते, असा आरोप ही गोटे यांनी केलाय. या प्रकरणानंतर कक्षअधिकारी किशोर पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी समिती गठित करण्याचा निर्णय विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी घेतलाय.


अर्जुन खोतकरांनी आरोप फेटाळले

याप्रकरणानंतर अर्जुन खोतकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. अनिल गोटे यांचे आरोप खोटे आहेत, या आरोपांमध्ये तथ्य नाही, खोटे आरोप करायची त्यांची जुनी सवय आहे असे खोतकर यांनी म्हटलंय.


अंदाज समिती म्हणजे काय ?

राज्य सरकार बजट सादर केल्यानंतर प्रत्येक विभागाला मागण्याप्रमाणे निधी देत असतो. तो निधी सरकारी अधिकारी खर्च करतात. सरकारी विभागाने केलेल्या खर्चाची ही समिती लेखाजोखा ठेवते. प्रत्येक जिल्ह्यात जावून ही समिती अधिकाऱ्यांकडे कागदपत्रे मागवून चौकशी करत असते. त्या चौकशीत अनियमितता आढळून आल्यानंतर कारवाई केली जाते.

अधिकारी समितीला घाबरतात पण…
समित्यांना कामकाज करताना विशेष अधिकार प्राप्त आहेत. समितीने रिपोर्ट दिल्यानंतर अधिकाऱ्यांची चौकशी होणे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे अधिकारी या समितीला घाबरून राहतात. परंतु या समितीकडून ही अनेकदा गैरप्रकार केले जाते. अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केले जाते. अनेक अधिकाऱ्यांकडे पैसे या समितीतील सदस्य घेतल्याचे पूर्वी उघडकीस आले आहे. त्यामुळे ही समिती दौऱ्यावर आल्यावर अधिकाऱ्यांकडून त्यांचा बडेजाव ठेवला जातो. त्यांना हवे नको ते सगळे पाहिले जाते. त्यासाठी ही रक्कम जमा केल्याचा आरोप गोटे यांनी केलाय. गोटे ही पूर्वी आमदार असताना या समितीमध्ये होते. अधिकारी व समितीती सदस्यांना पैसे देताना त्यांना पकडून दिले होते. पण त्या प्रकरणाचे पुढे काही झाले नाही. परंतु आता पकडलेली रक्कमेबाबत पोलिस चौकशी करतील. या प्रकरणाची एसीबीकडे चौकशी करण्याची मागणी होत आहे. परंतु सत्ताधारी आमदारांच्या दबाबामुळे सत्य समोर येईल का हा प्रश्न आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube