कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाही, चांगल्या चांगल्यांचे मुडदे…; रावसाहेब दानवेंचा खोतकरांना इशारा
Raosaheb Danve : जिंकल्याचं क्रेडिट घ्यायची पद्धत आहे, पण काही महाभाग म्हणतात रावसाहेब दानवे माझ्यामुळं हरले, त्यांचा सत्कारच केला पाहिजे, असा सणसणीत टोला भाजप नेते रावसाहेब दानवेंनी अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना लगावला. तसेच रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाही, चांगल्या चांगल्यांचे मी मुडदे पाडलेत, असा इशाराही त्यांनी खोतकरांना दिला आहे.
नवरात्र उत्सव; दांडीया स्पर्धेला कोपरगावात अभिनेत्री मानसी नाईक हजेरी लावणार
जालन्यात आज भापजचा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना दानवे बोलत होते. भाजपच्या या मेळाव्यात अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जालना विधानसभेची जागा भाजपला सोडण्याची मागणी दानवे यांच्याकडे केली. यावेळी रावसाहेब दानवेंनी जालना आणि घनसावंगी विधानसभेच्या जागा सोडवून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यामुळे जालना विधानसभेच्या जागावाटपाबाबत महायुतीत मोठा पेच निर्माण होणार असल्याची चर्चा आहे.
नवरात्र उत्सव; दांडीया स्पर्धेला कोपरगावात अभिनेत्री मानसी नाईक हजेरी लावणार
जालना विधानसभेच्या तयारीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत अर्जुन खोतकरांनी दानवे यांचे नाव न घेता टीका केली होती. ज्यांनी संकटात टाकलं त्यांना कधी सोडायचं नसतं आणि त्यांच्यापासून सावध पण रहायचं असतं. आता आपल्याला सावध राहण्याची वेळ आली आहे. ज्या कपटी लोकांनी आम्हाला छळलं, आम्हाला त्रास दिला त्याचा सत्यानाश झाला, असं म्हणत खोतकरांनी अप्रत्यक्षपणे दानवेंवर टीका केली होती. तर अब्दुल सत्तारांनीही दानवेंचा पराभव झाल्यानंतर आनंद व्यक्त केला होता.
दरम्यान, आता दानवेंनी अर्जुन खोतकर यांच्यावरही निशाणा साधला. जिंकल्याचं क्रेडिट घ्यायची पद्धत आहे, पण काही महाभाग म्हणतात रावसाहेब दानवे माझ्यामुळं हरले, त्यांचा सत्कारच केला पाहिजे, रावसाहेब दानवे हा काही कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाही, चांगल्या चांगल्यांचे मी मुडदे पाडलेत, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या पराभवाचे शल्य बोलून दाखवलं. अनेक महाभाग आपल्या पराभवाचे क्रेडिट घेत आहेत, पण आम्ही युतीतले माणसं असून बेईमानी करणार नाही, असं म्हणत त्यांनी खोतकर यांना टोला लगावला.
जालना विधानसभेवर शिंदेसेनेसह भाजपचा दावा…
जालना विधानसभेच्या जागेवर महायुतीतील भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला आहे. परंपरेनुसार, हा मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. मात्र, या जागेवर भाजपकडून दावा केला जातोय. रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांनी ही जागा भापजला सुटावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीत ही जागा कोणाला मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.