नेवाशात शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे विजयी, ठाकरे गटाचे माजी मंत्री शंकरराव गडाख पराभूत
Maharashtra Assembly Election 2024: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर आलाय. नेवासा विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. नेवासा विधानसभा मतदारसंघात (Nevasa Assembly Election 2024) शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे विजयी झाले आहेत. तर शंकरराव गडाख पराभूत झाले आहेत. नेवाश्यात महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे (Vitthalrao Langhe) यांना 92,449 मतं मिळाली आहेत. तर ठाकरे गटाचे शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांना 87,220 मतं मिळाली आहेत.
नेवाश्यात महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनी 5,229 मतांच्या आघाडीने दणक्यात विजयाचा गुलाल उधळला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात यंदा चांगलीच राजकीय संघर्ष पाहायला मिळणार. या मतदार संघामध्ये माजी मंत्री शंकरराव गडाख अपक्ष आमदार रिंगणात होते. दिवसांमध्ये झालेल्या राजकीय भूकंपांमुळे यंदाची निवडणुकीची गणितं बदलली होती.
महायुती सुसाट; महाविकास आघाडीला ‘विरोधी पक्ष नेतेपद’ मिळणार? माळवणकर रूल काय सांगतो…
गडाखांना देखील आपला किल्ला अभेद्य ठेवण्यासाठी यंदा चांगलीच कसरत करावी लागली, परंतु त्यांना तो ठेवता आला नाही. अशीच परिस्थिती निर्माण झाली. कारण यंदा महायुतीच्या उमेदवाराचं कडवं आव्हान गडाखांसमोर होतं. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. गडाखांना मतदार संघामध्ये असलेली नाराजी पाहता महायुतीच्या उमेदवारासाठी परिस्थिती अनुकूल ठरली आहे.
शरद पवारांना धक्का, अजित पवार पुन्हा घेणार आमदारकीची शपथ, बारामतीमध्ये मोठा विजय
महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख हे मागील निवडणुक म्हणजेच 2019 ची निवडणूक हे स्वबळावर लढले होते, त्यानंतर ते विजयी देखील झाले होते. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बिनशर्त पाठींबा देऊन ठाकरे घराण्यावर असलेली श्रद्धा आणि निष्ठा उघड केलेली होती. परंतु विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मात्र शंकरराव गडाख यांना पराभव स्विकारावा लागला आहे.